78 वा स्वातंत्र्य दिन नाशिक महानगरपालिका धृवनगर शाळा क्रमांक 22 मध्ये उत्साहात संपन्न
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची शाळा महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर नाशिक जी शाळा सातपूर भागातील शाळा आहे,त्या शाळेमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात 15 ऑगस्ट दिनी पार पाडला.

15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असल्याने देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाशिक महानगरपालिकेची शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये दिनकर आण्णा पाटील माजी सभागृह नेते, रवींद्र धिवरे मा. नगरसेवक, अमोल भाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते या ध्वजारोहन प्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा : जुन्या पेन्शन बाबत शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली “तपासणी समिती” गठित होणार
दिनकर आण्णा पाटील यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. अमोल भाऊ पाटील यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले आणि रवींद्र धिवरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला ध्रुवनगर परिसरातील ध्रुवतारा मित्र मंडळ यांनी शाळेतील सर्व मुलांना वह्यांचे वाटप केले. इयत्ता पाचवीतील पालक आत्माराम सुतार यांनी महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरच्या सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले. हे साहित्य वाटप दिनकरांना पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
साहित्य व खाऊवाटप यांची यादी या ठिकाणी देण्यात येत आहे.
श्री सांबरे, हिरामण सुबर, चव्हाण, खैरनार, शंकर कटारिया, बाळनाथ खैरनार यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले
त्याचबरोबर पिंटू सुतार, खैरनार काका, ध्रुवतारा मित्र मंडळ यांनी पेन,पाट्या,वह्या यांचे वाटप केले.
दिनकर आण्णा पाटील व मान्यवरांचे स्वागत संचलन व सलामीने विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
दिनकर आण्णा पाटील यांनी शाळेच्या नियोजनाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. ध्रुवनगरच्या मनपा शाळेमध्ये सर्वात जास्त पालक उपस्थित राहतात याबद्दल त्यांनी समाधान ही व्यक्त केले.
इयत्ता पाचवीतील सिद्धी गोवर्धने, प्रणय झरे, हर्ष भालेराव, व इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
ध्रुवनगर मधील जेष्ठ नागरिक खैरनार काका यांचा 15 ऑगस्ट या दिवशी वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस सुद्धा शाळेमध्ये औपचारिक स्वरूपात साजरा केला.
मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच शिक्षणतज्ञ उषाताई दिपके व गजानन दिपके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षक नामदेव जानकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचे लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, उपशिक्षक संतोष महाले आणि सुरक्षारक्षक उमेशकांत निकम यांचे सहकार्य लाभले.