रस्ता सुरक्षेबाबत समाजप्रबोधन : मनपा शाळा क्र. 49 पंचक शाळेचा कौतुकास्पद उपक्रम ! हा उपक्रम काय आहे,कसा आहे याबाबत सर्व माहिती या ठिकाणी.
Table of Contents
नाशिक महानगरपालिका शाळा क्र. 49 पंचक नाशिक मधील एक उपक्रमशील व सामाजिक जाणीव असणारी शाळा आहे. या शाळेत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत असतात.असाच एक उपक्रम दिनांक 28 रोजी शाळेने आयोजित केला होता. Social awareness regarding road safety: Municipal school no. 49 A laudable initiative of Panchak School
सद्यस्थितीत नाशिक जिल्हा हा पूर्ण भारतामध्ये अपघातांच्या बाबतीमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. चालकांच्या चुकांमुळे बरेच जीवघेणे अपघात नाशिक शहरामध्ये घडलेले आहेत.
हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावणे, अति वेगाने गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, सिग्नल जंपिंग करणे, झेब्रा क्रॉसिंग चा वापर न करणे अशा सवयींमुळे आजपर्यंत खूप अपघात घडलेले आहेत आणि त्यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे.
ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. या समस्येवर उपाय म्हणून नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 49 पंचक या शाळेतील आर एस पी अर्थात रोड सेफ्टी पेट्रोल या नाशिक मनपा शाळांतील एकमेव पथकाने गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने दसक या ठिकाणी गोदावरी घाटावर जाऊन समाज प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी, सीटबेल्ट लावा, जीव वाचवा, आवरा वेगाला, सावरा जीवाला अशा घोषणा देत गोदावरी घाटावर गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
हे ही वाचा
केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वाची माहिती.
यावेळी नाशिक चे पोलीस उपायुक्त,नासिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस, महिला पोलीस तसेच होमगार्ड यांनी विद्यार्थ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचाही खूप चांगला प्रतिसाद लाभला.
बरेच नागरिक कुतूहालापोटी विद्यार्थ्यांकडे बघत होते, त्यांच्या घोषणा ऐकत होते तसेच विद्यार्थ्यांच्या हातातील घोषणा फलक पाहून कुतूहल व्यक्त करत होते.शाळेचे मुख्याध्यापक किरण मोरे, केंद्र समन्वयक गोपाल बैरागी, नितीन नानकर, विठ्ठल नागरे, वाहतूक पोलीस हवालदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने शाळेतील आर एस पी रोड सेफ्टी पेट्रोल या पथकातील 30 विद्यार्थ्यांनी आरएसपी पथकाचे प्रमुख लक्ष्मीकांत संत व भूपेंद्र शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला.
हे ही वाचा
शुद्ध खाद्यतेल काढणारी मशीन : घरीच शुद्ध तेल काढा संपुर्ण माहिती.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नाशिक महानगरपालिकेतील शाळा,शिक्षक व विद्यार्थी हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात.त्यांना समाजाचा सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद मिळणे महत्वाचे आहे.