महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे कधी ही परत न येणाऱ्या प्रवासाच्या वाटेवर निघून गेले.
असे म्हटले जाते की, येणारी नवीन सकाळ नवा दिवस, नवी उमेद, नवी आशा घेऊन येते, पण आजची सकाळ, निराशा, दुःख, आश्चर्य, जीवनाविषयी नकारात्मक विचार घेऊन आली.
समाजात काही असे लोक असतात ज्यांच्या अस्तित्वाने हजारो लोक प्रेरित असतात.आशा,उमेद त्यांच्या बरोबर असते, पण नसल्याने या सर्व गोष्टीवर अंधाराचे पांघरून पडते.आजची परिस्थिती तशीच आहे.
हे ही वाचा : CITILINC कडून दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचा हृदयविकाराच्या त्रीव झटक्याने निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली आणि काळजात धस्स झाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची पोस्ट Whatsapp वर वाचली तेव्हा त्या विशाल जनसमुदायामधील पांढरा शुभ्र वेश परिधान केलेल्या अंबादास वाजे सर यांची मूर्ती डोळ्यासमोर आली.नक्की तेच आहेत का याचे मन चाचपणी करू लागले.वाजे सर यांना भेटण्याचा योग पहिल्यांदा आला, पण खूप वर्षाची ओळख असलेली जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख झाले. इतके दु:ख होण्याचे कारण हेच कि,ज्या पोटतिडकीने ते आंदोलनाचे नेतृत्व करीत होते ते मला भावले होते.अशी व्यक्ती आपल्यात नसणे ही खरोखर दु:खद गोष्ट आहे.
हे ही वाचा : वाषाण जिल्हा परिषद शाळेत डफळापूर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
वाटले, असा कसा मृत्यू येऊ शकतो एखाद्याला ? २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी गोल्फ क्लब मैदानावर नाशिक येथे जमलेल्या हजारो लोकांसमोर अंबादास वाजे अतिशय मनमोकळ्या पद्धतीने स्मित हास्य करत सर्वांशी हस्तांदोलन करत होते. चेहऱ्यावर कायमचे स्मित हास्य असणारा व्यक्ती आज सर्वांना दुःख सागरात लोटून कधीही परत न येणाऱ्या वाटेवर निघून गेला याचे अत्यंत वाईट वाटते.
शिक्षकांच्या मदतीला नेहमी धावून येणारे अशी ओळख असणारे अंबादास वाजे सर,असे कधी,आपल्या सर्वातून निघून जातील असे स्वप्नात ही वाटले नव्हते.त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करणारे आज अनेक लोक दु:खी आहेत.