राज्यातील शाळांमध्ये मिळणार उकडलेली अंडी : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत होणार पुरवठा.
Table of Contents
केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.1 ली ते इ.8 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार इ.1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक व 15 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इ.6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. Boiled eggs will be available in state schools
हे ही वाचा : शेतकऱ्यांना मिळणार आता Kisan Credit Card
हे ही वाचा : Sim Card rules : 1 डिसेंबर पासून संबंधित नियमात बदल होणार
सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेंतर्गत तांदुळापासुन बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलबध करुन देणे आवश्यक आहे. pradhan mantri Poshan Shakti Niraman
अंडयांमधील पौष्टिक मुल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व अंडी उत्पादक शेतक-यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजापेठ मिळण्यासाठी प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंडयांचा समावेश करण्याची विनंती केली आहे.
अंडयांमध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंडयांचा समावेश केल्यास विद्याथ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे.
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवास्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरीता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.
मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे.
- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टीक पदार्थ देण्याकरीता अंडी उपलब्ध करुन देण्यात यावेत.
- सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हयातील सर्व योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या नियमित आहाराव्यतिरिक्त 23 आठवडयाकरीता आठवडयातून एक दिवस अंडी देण्यात यावीत.
- सद्यस्थितीत अंडयांचा बाजारभाव विचारात घेता, एका अंडयासाठी रु.५/- इतका दर शासनाने निर्धारीत केलेनुसार अनुज्ञेय करण्यात येत आहे.
- जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्याथ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत रु.५/- मर्यादेत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.
- दर शुक्रवार या दिवशी पुरवठेदार यांनी आपल्या अधिनस्त शाळांमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी/अंडा पुलाव/ अंडा बिर्याणी या स्वरुपात लाभ देण्यात यावा, तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्याथ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पुरक आहार म्हणून केळी देण्यात यावी, सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुनघेण्यात यावी.
- सदर माहितीची या कार्यालयामार्फत तपासणी करण्यात येवून मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नाशिक यांचेमार्फत प्रत्येकी दोन महिन्यांनी संबंधित अन्न शिजविणा-या यंत्रणांना अंडी/फळे यांच्या देयकांची अदायगी केली जाईल.
- शुक्रवार या दिवशी काही अपरिहार्य कारणास्तव अंडी केळी वाटप करण्यास अडचण आल्यास त्याच्या लगतच्या दिवशी वाटप करण्यात यावी.
- शाळांनी निर्यामत आहाराची उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे आवश्यक राहील, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीअंतर्गत असणा-या शाळांनी देखील दैनंदिन उपस्थिती माहिती एमडीएम पोर्टलवर करणे आवश्यक राहील. अंडी केळी याचा विद्यार्थ्यांना निर्धारित दिवशी लाभ दिल्यास परंतु सदर दिवशी विद्याथ्यांची उपस्थिती एमडीएम पोर्टलवर नोंदविली नसल्यास, सदर दिवसाकरीता वितरीत केलेल्या अंडी । केळी याकरीताचे अनुदान अनुज्ञेय केले जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.
- अंडी / फळांचा लाभ शाळास्तरावर आठवडयात एक वेळेस देणे आवश्यक आहे.
- यासोबतच निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार आठवड्यातून एक दिवस नियमितपणे देण्यात येणा- या पुरक आहाराचा लाभ दर बुधवारी देणे आवश्यक राहील,
- मुख्याध्यापकांनी प्रति विद्यार्थी एक अंडे किया ५ रू दराच्या प्रमाणात केळी विद्याथ्यांना प्राप्त झाले कि नाही याची खात्री करून घ्यावी, प्राप्त अंडी केळी नुसारच एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंद घ्यावी, त्याप्रमाणचे बिल सादर करण्यात यावे,
- मुख्याध्यापकांनी अंडी खाणान्या विद्याथ्यांची संख्या व केळी खाणान्या विद्याथ्यांची संख्या पुरवठादार यांना अदल्या दिवशीच कळविण्यात यावी,
13 . केळी खाणान्या विद्याथ्यर्थ्यांना निर्यामत आहार देण्यात यावा, पुरवठेदार यांनी फक्त उकडलेलो अंडी वाटप केल्यास त्यासोक्त निर्यामत आहारही विद्यार्थ्यांना देण्यात यावा,
- पुरवठेदार यांनी शाकाहारी पाककृती व अंडयाच्या पाककृती करतांना स्वतंत्र भाडयांचा वापर करण्यात यावा.