मराठा आरक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रश्नावली नुसार महाराष्ट्रात सर्वेक्षण होणार या विषयी सविस्तर माहिती.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण संबंधीचा ज्वलंत प्रश्न धगधगत आहे. याच संदर्भात नाशिक शहरात दिनांक 23/1/2024 ते 31/1/2024 रोजी पर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण होणार आहे. नाशिक शहरात सदर सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाकडून आलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने होणार आहे.
हे ही वाचा: Ram mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असणार |मुख्यमंत्र्यांचा निर्णय
नाशिक शहरात सर्वेक्षणासाठी उपआयुक्त यांना सहा. नोडल अधिकारी म्हणून निवडलेले आहे. सर्वेक्षणासाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी व यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.यासाठी प्रगणक म्हणून बहुतांश शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवडलेले प्रगणक दिलेल्या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत व परिपत्रकाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन होणार आहे.
नोडल अधिकाऱ्याने निवडलेल्या प्रगणकाला वाटून दिलेल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षणाचे कार्य पार पाडावे लागणार आहे. त्याला सर्वेक्षणासंबंधीचे सर्व कामकाज हे काटेकोरपणे व दिलेल्या वेळात पूर्ण करावे लागणार आहे. प्रगणकाला दर दिवशी त्यांनी केलेल्या कामकाजाबाबत तालुकास्तरीय कक्षाकडे माहिती सादर करावी लागणार आहे.
हे ही वाचा: अग्निवीरवायू भरती सुरु : लगेच अर्ज करा.
नोडल अधिकाऱ्याने निवडून दिलेल्या प्रगणकाला सर्वेक्षणासाठी विकसित संगणक प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक प्रगणकाला या प्रशिक्षणासाठी निश्चित वेळेत उपस्थित राहून प्रशिक्षण घेणे गरजेचे होते ते त्यांनी घेतले आहे. प्रगणकाला या सर्वेक्षणासाठी सर्व समाजाकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे.