जागतिक आदिवासी दिन : धृवनगरच्या नाशिक मनपा शाळेत मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर माहिती.
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची शाळा महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22ध्रुव नगर मध्ये जागतिक आदिवासी दिन विविध उपक्रमास सह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार हे निश्चित होते, परंतु 9 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक मनपा क्षेत्रातील शाळांना सुट्टी असल्याने हा कार्यक्रम आठ ऑगस्ट 2024 रोजी विविध उपक्रमास साजरा करण्यात आला.
हे ही वाचा : नाशिक महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार 2023-24 चे निकष व प्रस्तावा बाबत महत्वाची माहिती
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुव नगर मध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध उपक्रमाबरोबरच वक्तृत्व स्पर्धा, वारली चित्रकला, स्पर्धा नृत्य, स्पर्धा वेशभूषा, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आले होते.
या विविध स्पर्धा मधून विद्यार्थ्यांचे प्रत्येकी तीन- तीन क्रमांक काढण्यात आले व त्यांना बक्षीसही वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व घटकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक उपशिक्षिका यांनी मुलाबरोबर आपला आनंद साजरा केला.
हे ही वाचा : शिक्षण परिषद : सातपूर विभागात समूहसाधन केंद्र क्रमांक 21 व 14 ची शिक्षण परिषद संपन्न
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डोकफोडे, उपाध्यक्ष सौ. जगताप आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ उषाताई दिपके व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पाचवी कडे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नामदेव जानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी,उपशिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, उपशिक्षक संतोष महाले, ईश्वर चौरे यांनी प्रयत्न केले.
वरिष्ठ पातळीवरून नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोकजी करंजकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी.टी पाटील, केंद्राचे केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.