बाल चित्रकला स्पर्धा 2024 बाबत सर्वात महत्त्वाची माहिती,स्वरूप,निकष !
Table of Contents
प्रत्येक वर्षी बालचित्रकला स्पर्धा ही जिल्हा परिषदे कडून आयोजित करण्यात येत असते.या वर्षी ही चित्रकला आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त पोषक वातावरण निर्माण व्हावे. यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा या दृष्टीकोनातून काही आवश्यक ते बदल करून शासनाने १९९४ पासून बालचित्रकला स्पर्धा आयोजनास कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली आहे.
हे ही वाचा : 78 वा स्वातंत्र्य दिन आयोजनाबाबत शासनाचे महत्वाचे निर्देश सविस्तर वाचा
त्याअनुषंगाने मनपास्तरावर सन २०२४ मध्ये ही स्पर्धा दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० ते ०१.०० यावेळेत घेण्याचे निश्चित केले आहे.
स्पर्धा वयोगट
अ) गट पहिला ७ वर्ष वयोगट
आ) गट दुसरा – ७ ते ९ वर्ष वयोगट
इ) गट तिसरा – ९ ते १२ वयोगट
ई) गट चौथा – १२ ते १६ वयोगट
तरी सर्व केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील वरील प्रत्येक वयोगटानुसार केंद्रातून प्रत्येकी एक विद्यार्थ्यास बाल चित्रकला स्पर्धेस उपस्थित ठेवावे. (वरील ४ वयोगटातून प्रत्येकी एक याप्रमाणे केंद्रातून ४ विद्यार्थी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.) मनपा शाळा क्र – 57 मुक्तीधाम जवळ, नाशिकरोड, या ठिकाणी.
स्थळ :-
वेळ :- सकाळी ११.०० ते ०१.००
दिनांक :- १३ ऑगस्ट २०२४ महत्वाच्या सूचना-:
१) सहभागी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका (चित्रकला स्पर्धेचा विषय) स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात येईल.
२) सहभागी विद्यार्थ्यांनी चित्रकलेचा कागद स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
३) चित्राचे रंगकाम करण्यासाठी जलरंग, रंगीत खडू, रंगीत पेन्सिल त्याबरोबर इतर अत्यावश्यक साहित्य स्वतः घेवून येण्यास कळविण्यात यावे.
४) स्पर्धेस वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, उशिराने येणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
५) केंद्रप्रमुखांनी केंद्रातील स्पर्धक स्पर्धेस उपस्थित ठेवणे बंधनकारक आहे, ज्या केंद्रातील स्पर्धक उपस्थित राहणार नाहीत, त्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रप्रमुख यांच्यावर निश्चित करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.