विधानसभा निवडणुक शाळांच्या सुट्टीबाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय

विधानसभा निवडणुक शाळांच्या सुट्टीबाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय सविस्तर माहिती खालील प्रमाणे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने शाळांना सुट्टी देण्याबाबत स्पष्ट परिपत्रक जारी केलेले आहे. 16 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षण आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर 2024 रोजी शाळा सुरू राहतील. यासाठी केवळ त्या शाळांना सुट्टी दिली जाईल, ज्या शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले आहेत, अशा शाळांना या दिवशी सुट्टी देण्यात येईल असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

हे ही वाचा : चलो बने आदर्श : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचा क्रांतिकारक निर्णय

या परिपत्रकामध्ये शासनाने स्पष्ट केले आहे की 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही.यामुळे या शाळांना नियमित पणे आपले कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे आणि शाळेतील सर्व शिक्षक निवडणूक कामासाठी जर नियुक्त केलेले असतील तर संबंधित मुख्याध्यापकांनी स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर केली तरी ती चालणार आहे.

या परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहे की विशिष्ट परिस्थितीतच शाळांना सुट्टी देण्यात यावी विनाकारण शाळेचे कामकाज बंद ठेवण्यात येऊ नये. असे आदेश शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेल्या सूचनानुसार संबंधित सर्व शाळांना या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.

शासनाचा निर्णय काय आहे तो खालील प्रमाणे आपण पाहूया.

18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील शाळा सुरू राहतील.

निवडणूक कामासाठी नियुक्त शिक्षक असलेल्या शाळांना स्थानिक स्तरावर सुट्टी देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

कोणतीही शाळा अनावश्यक पणे बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे शासन निर्देश आहेत.

Leave a Comment