बाबासाहेब जानकर यांची मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सहसचिव पदी निवड यांची सविस्तर माहिती अशी आहे.
Table of Contents
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यामध्ये शिक्षक भवन येथे पार पडली. या झालेल्या बैठकीमध्ये बाबासाहेब जानकर यांची मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्यसहसचिव पदी एकमुखाने निवड करण्यात आली.Babasaheb Jankar elected as State Joint Secretary of Backward Class Teachers’ Association
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या कार्यकारणी मध्ये फेरबदल करण्यात आले.
हे ही वाचा : केंद्र शासकीय शाळा : पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येणार
बाबासाहेब जानकर यांची यावेळी सर्वांनुमते निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बाबासाहेब जानकर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बैठकीसाठी राज्याचे सरचिटणीस कैलास बोढारे, राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, कोषाध्यक्ष अनिल बागुल, राज्य कार्याध्यक्ष चंदन लांडगे, राज्य महिला प्रतिनिधी मोरे मॅडम इत्यादींचे उपस्थितीत महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सचिव पदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटी, तालुका जत,सांगली येथील उपशिक्षक बाबासाहेब जानकर यांची निवड करण्यात आली.
हे ही वाचा : अभिमानास्पद : गणेश लोहार मानद डॉक्टरेट ने सन्मानित
यावेळी शिक्षक संघटनेचे पुणे विभाग सचिव प्रल्हाद हुवाळे, जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे, जत तालुका कोषाध्यक्ष शांतीलाल साळुंखे, जत तालुका संपर्कप्रमुख सुरेश जायभावे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
यापूर्वी बाबासाहेब जानकर हे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांनी संघटने मध्ये केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना राज्य पातळीवर सहसचिव पदाची संधी मिळाली असे बोलले जात आहे.