निपुण उत्सवाबाबत आत्ताची सविस्तर माहिती.

निपुण उत्सवाबाबत आत्ताची सविस्तर माहिती.

निपुण महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत दिनांक १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान माता पालक गटांना भेटी देऊन निपुण उत्सव राबविणे बाबत शासन स्तरावरून शाळांना सूचना प्राप्त झाले आहेत.

निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभुत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माता पालक गटांची स्थापना करणे व सहभागी करुन घेणे बाबत यापूर्वी आदेशीत करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५ मध्येही आपल्या विभागातील प्रत्येक शाळा अंतर्गत व गाव पातळीवर वाडी वस्तीनिहाय मातापालक गटाची पुनर्बांधणी होऊन दिलेल्या आयडीया व्हिडिओच्या मदतीने माता गटाचे कार्य सुरु आहे. असे शाळांनी भरलेल्या माता पालक गटाच्या प्राप्त माहितीद्वारे दिसून येते.

हे ही वाचा: हिरवीगार परसबाग: ध्रुवनगरच्या मनपा शाळेने फुलवली

निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान निपुण उत्सव राबविण्यात येणार आहे. यात माता गटांना भेटून प्रोत्साहन द्यायचे आहे. निपुणचे लक्ष साध्य करण्यासाठी मुलांच्या शिक्षणात माता पालक गटाचा नियमित सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

निपुण उत्सव राबविण्याकरिता १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये आपण स्वतः व आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी (वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटसमन्वय, विषय साधन व्यक्ती, विषय शिक्षक सर्व समावेशित साधन व्यक्ती) यांनी शाळा भेटी करून मुख्याध्यापक / शिक्षक समवेत प्रत्येकी गावात माता पालक गटांना भेटी द्याव्यात.

प्रत्येक अधिकारी/ कर्मचारी यांनी किमान तीन गावातील सर्व माता पालक गटांना भेट द्यावी. उर्वरित गावात माता-पालक गटास विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार सदर कालावधीत भेटी देण्यात येणार आहेत.

माता आणि माता गटांच्या भेटी दरम्यान खालील मुद्यांच्या आधारे चर्चा करण्यात येणार आहे.

  1. प्रत्येक गावात वाडी-वस्ती निहाय माता पालक गट तयार झाले आहे का? या वर्षामधील झालेल्या गटांची पुनर्बाधणीत इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांच्या माता या गटामध्ये सहभागी आहे का हे पाहणे.
  2. मुद्दा क्रमांक १ नुसार इयत्ता ४ थी च्या माताही या गटाचा भाग आहेत का आणि इतर (इयत्ता १-२-३ व्यतिरिक्त) मातांना या गटात सहभागी व्हायचे आहे का, आणि असल्यास का?
  3. प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यास आयडीया व्हीडीओ मिळतात का?
  4. गावातील सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडीया व्हीडीओ मध्ये सांगीतल्या प्रमाणे काम करतात का?
  5. माता गटाच्या भेटी दरम्यान व्हिडिओ सोबत दिलेल्या वर्कशीट मुलांना उपयुक्त वाटल्या का? याची नोंद घ्यावी.
  6. आपल्या मुलांने निपुण व्हावे या बदल मातांना नेमके काय वाटते आहे?
  7. माता पालक गटासोबत भेटी देणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांनी आयडीया व्हीडीओ मधील काही टास्क करुन दाखवावा.
  8. मातांनी शाळेत जाऊन शिक्षक आणि मातांची संयुक्त चर्चा करण्यास प्रोत्साहित करावे.
  9. शिक्षक व इतर मंडळी या माता-पालक गटांना कसे सहकार्य करीत आहे याबाबत चर्चा करावी.
  10. प्रत्येक शाळेत निपुण प्रतिज्ञा व निपुणची उदिष्ट लावण्यात आली का हे पाहणे व माता पालक गटासंबंधी शाळेमध्ये माहितीसाठी स्वतंत्र रजिस्टर केले आहे का हे बघणे,
  11. माता गटात काय काय गमती जमती होत आहेत.
  12. मातांना आणि माता गटांना विचारा- या उपक्रमामध्ये त्यांना अजून काय समाविष्ट करायला आवडेल.
  13. सर्व भेटींनंतर मिळालेल्या निष्कर्षांचे, अनुभवांचे आणि सूचनांचे पुनरावलोकन करण्यासाठी प्रत्येक स्तरावर एक आढावा बैठक घ्यावी. तसेच या प्रक्रियेत प्रथम (Pratham) संस्थेचे प्रतिनिधी सहकार्य करतील. 14. गट भेटीदरम्यान गटाचे काम दाखविणारे निवडक फोटो, व्हिडिओ त्यांच्या परवानगीने घेण्याचा प्रयत्न करावा.

वरिल सर्व मुद्यांची गावातील माता पालक भेटी दरम्यान चर्चा करण्यात येणार आहे व या भेटी दरम्यानची आपले चर्चा व निरीक्षणे बाबत संकलित माहितीची नोंदणी राज्यस्तर दिलेल्या लिंकद्वारें नोंदवण्यात येणार आहे.

सदरील लिंक आपल्याला WhatsApp समूहात पाठविण्यात येईल. निपुण उत्सवाची सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी प्रथम प्रतिनिधी गणेश पाटील संपर्क ९६२३०५८००९ यांच्याशी संपर्क करावा अशी सूचित करण्यात आले आहे.

निपुण उत्सव पूर्वतयारी मध्ये जिल्हास्तरावरून सर्व क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचारी यांची निपुण उत्सव संदर्भात माता गटांना भेटी देण्याबाबत सूचित करावे.

संकल्पना समजून घेण्याकरिता विभागस्तरावर या संदर्भात ऑनलाईन उद्बोधन सत्राचे आयोजन केले जाईल सर्व जिल्ह्यांनी प्रथम प्रतिनिधी यांच्या सहभागाने नियोजन व कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर ऑनलाईन उद्बोधन सत्राचे आयोजन केले जाणार आहे.

निपुण उत्सव दिनांक १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राबवावा. सदरील निपुण उत्सव बाबत अहवाल विभाग स्तरावर सादर करण्यात येणार आहे.

सोबत विभाग व जिल्हास्तरावर होणाऱ्या ऑनलाईन उद्बोधन सत्राचे नियोजन जोडले आहे.

Leave a Comment