Aashadhi ekadashi : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन

Aashadhi ekadashi : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन याबाबत सविस्तर माहिती.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या धृवनगरच्या मनपा शाळेत ५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. आषाढी एकादशी ही ६ तारखेला येत असल्याने त्या दिवशी रविवार असल्याने शाळेला सुट्टी असते म्हणून शनिवार रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगरच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.

हिंदू धर्मात व वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला खूप मोठे महत्त्व आहे. या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखोंचा जनसमुदाय एकवटत असतो. पंढरपूर मधील वातावरण भक्तीमय आणि अध्यात्मिक बनत असते.

हे ही वाचा : विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीसे जिंका !

दरवर्षी आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील एकादशी तिथीला साजरी करण्यात येते. नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आषाढी एकादशीं चे महत्व समजावे, भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म हा विषय त्यांना समजावा या उद्देशाने धृवनगरच्या मनपा शाळेत आषाढी एकादशीनिमित्त आज दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडीच्या कार्यक्रमाला बहुतांश विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी वारकरी सांप्रदायातील वारकऱ्यांची वेशभूषा केलेली होती. या वेशभूषे पाठीमागे विद्यार्थ्यांच्या पालकांचे परिश्रम दिसून येत होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत धृवनगर मधून दिंडी काढली.

हे ही वाचा : जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम जुना आणि नवीन ! या विषयी माहिती

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी नी विठ्ठल नामाच्या भक्तीमय गीतावर समूह नृत्य केले. धृवनगर परिसरातील नागरिकांनी सुद्धा दिंडीमध्ये सहभाग घेऊन अभंग गायन केले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका कल्पना पवार, उपशिक्षक नामदेव जानकर, संतोष महाले आणि ईश्वर चौरे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment