ध्रुवनगरच्या मनपा शाळा परिसरात आषाढी एकादशी दिंडी सोहळा अवतरला !

ध्रुवनगरच्या मनपा शाळा परिसरात आषाढी एकादशी दिंडी सोहळा सविस्तर माहिती !

सातपूर विभागातील ध्रुवनगर मनपा शाळेमध्ये 16 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.या उपक्रमा पाठीमागे विद्यार्थ्यावर या उपक्रमांचे संस्कार व्हावे व कामाचा अनुभव प्राप्त व्हावा हा असतो.

ध्रुवनगर मनपा शाळा क्रमांक 22 ही शाळा विविध उपक्रमासाठी नेहमी अग्रेसर असते. हे उपक्रम विविध विषयासंबंधीत व विविध विभागाशी संबंधित असतात. येथील विद्यार्थी व पालक या उपक्रमांना नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात. उपक्रम ज्या प्रकारचा असतो. त्याशी अनुरूप  विद्यार्थ्यांची तयारी करून मुलांना शाळेत पाठवत असतात. आषाढी एकादशी दिंडी सोहळ्यांसाठी पालकानी आपल्या पाल्याची योग्य तयारी केलेली होती. कुणी विठ्ठल बनून आलेले होते, कुणी रुक्मिणी बनून आलेले होते, बहुतांशी विद्यार्थी वारकरी बनून आलेले होते.

आषाढी एकादशी

महानगरपालिका शाळा क्रमांक 22 च्या क्रीडांगणावर अक्षरश: पंढरी अवतरलेली दिसून येत होती..विठुरायाची पालखी सजवण्यात आलेली होती. या पालखी सोहळ्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत होता.हा सोहळा ध्रुवनगर भागातून विठ्ठल नामाचा गजर करत पुढे पुढे जात होता.

हेही वाचा : महाज्योती योजने मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा कसा मिळवाल |

ध्रुवनगर भागातील लोकांनी  सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिक व महिला यांनी अभंग व गीते गायिली. 

या दिंडी सोहळा कार्यक्रमाला वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील  यांचे लाभले. त्याचबरोबर केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे व मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उपशिक्षक ईश्वर चौरे व नामदेव जानकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक अर्थात मुख्याध्यापक सोनजी गवळी, उपशिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, नामदेव जानकर, संतोष महाले आणि ईश्वर चौरे यांचे लाभले 

Leave a Comment