अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांच्या हस्ते

अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या हस्ते सविस्तर माहिती

अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन नाशिक आयोजित वाक्यो-वाक्यम् प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सिडको, नाशिक येथील मनपा शाळा क्रमांक 70, तोरणा नगर केंद्र क्र. 8 येथे अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. केंद्रसमन्वयक वैशाली क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक मनपा शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या हस्ते झाले.Augustational Searched Questionnaire Experienced Education Officer BT Patil Interval

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वीर बाल दिवस साजरा होणार

उद्घाटन प्रसंगी शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अगस्त्य ऋषींच्या नावावरून फाउंडेशनला मिळालेल्या प्रेरणेचा इतिहास आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन उलगडून दाखवला. त्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख माळी, वैशाली क्षीरसागर , श्रीमती हिंगे आणि श्रीमती अन्सारी यांसह मुख्याध्यापक दुडे , गायकवाड , मोरे आणि श्रीमती निकम यांचीही उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शिक्षक आणि पालकांनी स्पर्धेबद्दल सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला.

हेही वाचा : बाबासाहेब जानकर यांची मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सहसचिव पदी निवड

या स्पर्धेत नाशिकमधील 21 शाळांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये महानगरपालिकेच्या तसेच अनुदानित शाळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी विविध टप्प्यांमधून उत्तम कामगिरी करत शैक्षणिक ज्ञानाची कसोटी यशस्वीपणे दिली. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, जुने सिडको यांनी पटकावला. मनपा शाळा क्रमांक 70 द्वितीय क्रमांकावर तर डॉ. प्रशांत दादा हिरे माध्यमिक विद्यालय, अशोक नगर तृतीय क्रमांकावर राहिले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सुत्रसंचालन सिद्धेश शेटे यांनी अत्यंत कौशल्याने आणि प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पुढाकार विक्रम अवघडे , अलिशा गुंजाळ, स्नेहा नगरकर, सारथी केशव बोरसे आणि भिसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षक-पालकांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, ज्ञानवृद्धी आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली. उपस्थित सर्व मान्यवरांनी आयोजनाच्या यशस्वितेसाठी आयोजकांचे कौतुक केले.

Leave a Comment