राज्यातील शाळांमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान : पार्श्वभूमी,व्याप्ती संपूर्ण माहिती.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे. In the cabinet, “Chief Minister My School, Beautiful School Campaign”.
हे ही वाचा : राज्यातील शाळांमध्ये मिळणार उकडलेली अंडी !
हे ही वाचा : शेतकऱ्यांना मिळणार आता Kisan Credit Card
हे ही वाचा : Sim Card rules : 1 डिसेंबर पासून संबंधित नियमात बदल होणार !
राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ४७८ शाळांचा समावेश असलेला सदर योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. सदर योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत आतापर्यंत केवळ भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान बांधकामे व मोठी बांधकामे याच बाबींकडे लक्ष देण्यात आले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक झाले आहे. अशा महत्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वांगीण विकास निश्चितपणे होऊ शकतो.
उपरोल्लेखित घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्याप्रमाणे शाळा मध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.