दप्तरमुक्त शनिवार : शिक्षणाधिका-यांनी घेतला हातात झाडू मनपा शाळा क्र.53 चेहडी यांच्या स्वच्छ्ता मोहिमेत !

दप्तरमुक्त शनिवार : नाशिक मनपा शाळा क्र.53,स्वच्छ्ता मोहिम संपन्न..! पांडवलेणी परिसरात मध्ये शिक्षणाधिका-यांनी घेतला हातात झाडू सविस्तर माहिती पाहूया.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये अलीकडेच ” दप्तरमुक्त शनिवार” हा उपक्रम आयोजित करण्यात येत असतो.त्यामुळे प्रत्येक शाळेत त्या अंतर्गत विविध उपक्रम दप्तरा शिवाय आयोजित करण्यात येत असतात.त्याचाच एक भाग म्हणून मनपा शाळा क्र.53 चेहडी येथील शाळेने काहीसा वेगळ्या प्रकारे हा उपक्रम आयोजित केला होता.

हे ही वाचा

पुस्तक पेढी योजना : प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील

शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी “दप्तरमुक्त शनिवार” या उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्रमांक 53 चेहडी शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवी च्या विध्यार्थीच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या प्रेरणेने पांडवलेणी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. Paperless Saturday: The education officer took a broom in the hands of Municipal School No. 53, in a clean campaign.

सध्या स्वछता पंधरवडा सुरु असून त्याचाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला होता.शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांचा कल्पनेतून हा उपक्रम सुचला होता. कारण ही तसेच होते,अनेक पर्यटक पांडवलेणी परिसरात येत असतात. सोबत खाण्यासाठी वेगवेगळे खाद्य पदार्थ आणत असतात व त्याठिकाणी मोठया प्रमाणात कचरा होत असतो. त्याठिकाणी स्वच्छता होत नसल्याने या परिसराची निवड करण्यात आली होती.


तसेच विद्यार्थी वर्गात ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व संवर्धन करण्याबरोबरच त्यांना जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याची जाणीव या माध्यमातून करून देणे व संपूर्ण शहरांमध्ये स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे उद्दिष्ट होते.

त्याच वेळी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल व आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू बद्दल आपुलकी निर्माण होणे हे ही महत्त्वाचे आहे. याप्रसंगी पांडवलेणी परिसरातील सकाळी फेरफटका मारत असलेल्या अनेक सामान्य नागरिकांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.केंद्रप्रमुख ईश्वर चव्हाण यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.

हे ही वाचा

Chat bot,PAT (महाराष्ट्र) यावर पायाभूत चाचणी गुण नोंद कशी कराल ?

शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजे पर्यंत 4 मोठे पोते प्लॅस्टिकसह विविध प्रकारचा कचरा एकत्रित गोळा केला होता.जवळ जवळ 100 विध्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. शिक्षणाधिकारी स्वतः या ठिकाणी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत असल्याने विध्यार्थ्यांनाही व शिक्षकांनाही या ठिकाणी उत्साह येत होता.शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांच्याबाबत एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावी असे वाटते.”बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.” ते जसे बोलतात तसे वागतात्त सुद्धा हे त्या दिवसाच्या प्रसंगावरून लक्षात येते.

हे ही वाचा

गणेश उत्सव 2023 नाशिक महानगरपालिका : गणेशभक्तांना आवाहन !

या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही या उपक्रमाचे स्वागत केले. खूपच सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेवटी सर्व विध्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. मुलांना पांडवलेणी परिसराची माहिती नाथूषा फकीर यांनी दिली. “स्वच्छ नाशिक , सुंदर नाशिक” हा नारा या वेळी उपस्थित सर्वांनी दिला.
उपक्रम यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख ईश्वर चव्हाण, मुख्याध्यापक बाळासाहेब निरगुडे , नाथूषा फकीर, संदीप नरुटे, प्रदीप पवार,कापसे चेतना, शिल्पा शिंदे, भावना सोनवणे , रंगनाथ खालकर, साहेबराव ताजनपुरे इत्यादिंनी प्रयत्न केले.

Leave a Comment