हिरवीगार परसबाग: ध्रुवनगरच्या मनपा शाळेने फुलवली या विषयी सविस्तर माहिती
ध्रुवनगर शाळेने क्रीडांगणामध्ये सुंदर परसबाग फुलवली असून याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची धृवनगर येथील शाळेने आपल्या आवारामध्ये सुंदर अशी परसबाग फुलवली आहे. या हिरवीगार परसबागेमध्ये विविध फळभाज्या, फुलझाडे यांचा समावेश आहे. ध्रुवनगरच्या मनपा शाळेला समृद्ध असा परिसर लाभलेला आहे. या शाळेच्या आवारामध्ये शंभरहून जास्त झाडे अगोदरच आहेत.
या झाडांमध्ये आंबा, पेरू, अंजीर, सिताफळ, बोर, उंबर, बदाम, जांभूळ, नारळ अजूनही विविध झाडांचा समावेश आहे.
हे ही वाचा: दिव्यांग: विध्यार्थ्यांसाठी स्क्रीनिंग व वैद्यकीय मुल्यांकन आणि आरोग्य तपासणी
या शाळेचा परिसर डिडोणीच्या नक्षीने व्यापलेला आहे. डिडोनी ची छाटणी अतिशय काटेकोरपणे या शाळेने केलेली आहे. त्यामुळे परिसर अतिशय सुंदर दिसतो. परिसरामध्ये डिडोणीच्याच बाजूला ठोकळे बसवण्यात आल्याने शाळेच्या शोभेमध्ये आणखी भर पडलेली आहे.
शाळेच्या भोवतीचा परिसर संपूर्ण झाडांनी वेढलेला असून या ठिकाणी विद्यार्थी अतिशय रममान होतात. या हिरवीगार परसबागेची निगा दर शनिवारी विद्यार्थी व शिक्षक नियमितपणे करत असतात. फळभाज्यांना पाणी देण्याची गरज असेल तेव्हा हे कार्य पार पडत असतेच परंतु याचे संरक्षण करण्याचे काम सुद्धा विद्यार्थी प्रामाणिकपणे करत असतात.
हे ही वाचा: स्पेलिंग बी उपक्रम नाशिक महानगरपालिका शाळेमध्ये
शाळेच्या भल्यामोठ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला डिडोणीच्या पलीकडे विद्यार्थ्यांनी कुंपण घालून परसबाग बनवली आहे. या परसबागेमध्ये वांगे, टमाटे इत्यादींचा समावेश आहे. वांग्याची रोपटे अतिशय टवटवीत असून त्यांना आत्ताच फळ लागण्यास सुरुवात झाली आहे.
परसबाग तयार करण्याचा उद्देश खूप मोठा आहे. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शेती विषयी आवड निर्माण व्हावी, हा उद्देश या पाठीमागे आहे. आधुनिक काळामध्ये शेतीबाबत जो दृष्टिकोन तरुणांमध्ये तयार झालेला आहे, तो पुसून शेती एक चांगला व्यवसाय आहे, अशी प्रतिमा मुलांमध्ये निर्माण होणे कामी या परसबागेचा उपयोग होणार आहे.
या फळबागेच्या संवर्धनाचे व निगा राखण्याचे कामाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी हे नेहमी करत असतात. शाळेतील उपशिक्षिका कल्पना पवार, दिपाली काळे, उपशिक्षक नामदेव जानकर, ईश्वर चौरे व सुरक्षारक्षक उमेशकांत निकम हे मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली परसबागेचे व्यवस्थापन करत असतात.
ध्रुवनगरची मनपा शाळा ही प्राथमिक शाळा असून या शाळेने अतिशय उल्लेखनीय असा परसबागेचा उपक्रम राबवला आहे.






