दिव्यांग: विध्यार्थ्यांसाठी नाशिक मनपा स्तरीय स्क्रीनिंग व वैद्यकीय मुल्यांकन आणि आरोग्य तपासणी या बाबत सविस्तर वृतांत
Table of Contents
दिव्यांग विद्यार्थ्यांची अचूक ओळख करून त्यांना योग्य शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरविणे हाच हेतू असतो. योग्य वैद्यकीय तपासणीद्वारे त्यांच्या गरजा समजून घेणे.शैक्षणिक योजनांमध्ये समावेशासाठी सहाय्य करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्टे आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पास ५ वर्षे पूर्ण केली असल्याने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत ओळख, मूल्यांकन आणि साहित्य साधने वितरण शिबीर दिनांक २९.०७.२०२५ पासून आयोजित करण्यासाठी कळविलेले आहे.
हे ही वाचा: स्पेलिंग बी उपक्रम नाशिक महानगरपालिका शाळेमध्ये आयोजित होणार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या दृष्टिकोनाशी सुसंगत ज्यामध्ये विशेष गरजा असलेल्या मुलींसह (CWSN) सर्व मुलांसाठी समावेशक, समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे, त्याअनुषंगाने आपल्या शिक्षण व्यवस्थेतील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात येत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पास ५ वर्षे पूर्ण झाली असल्याने अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) पा राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, समग्र शिक्षा चौकटी अंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांसाठी मनपा-स्तरीय स्क्रीनिंग आणि मूल्यांकन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
YouTube: activenama
सदर वैद्यकीय मूल्यांकन शिबिरे ही केवळ नियमित तपासणी प्रक्रीया नसून प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गरजा ओळखण्यासाठी, त्याचे काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना सहाय्यक उपकरणे उपचार, लवकर हस्तक्षेप आणि घर-आधारित शिक्षण यासारख्या आवश्यक सहाय्य सेवांशी जोडण्यासाठी एक करुणामय आणि केंद्रित प्रयत्न आहे.
हे ही वाचा: Disability: दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवेश व नियमित शिक्षण
तरी सर्वांसाठी समान आणि समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हा ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पास ५ वर्षे पूर्ण केली असल्याने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमे अंतर्गत वैद्यकीय मूल्यांकन शिबीर दि २९/०७/२०२५ ते दि ०२/०७/२०२५ या कालावधीत आयोजित केले.

त्यानुषंगाने समग्र शिक्षा अभियान दिव्यांग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नाशिक महानगपालिका परिक्षेत्रातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनपास्तरीय वैद्यकीय मुल्यांकन शिबीर दि.२९/०७/२०२५ ते दि.०२/०८/२०२५ या कालावधीत वरील कोष्टकात दिलेल्या वेळा पत्रका प्रमाणे ओजीत केले आहे.
हे ही वाचा: हरितकुंभ संकल्पनेनुसार नाशिक मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार |
आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्याचे दिव्यांग प्रमाण पत्र व UDID कार्ड काढायचे आहे असे विद्यार्थी व ज्या विद्यार्थ्यांना स्पीच थेरपी व फिजीओथेरपी औषध उपचाराची आवश्यकता आहे. अशा संदर्भित विद्यार्थ्यांना शिबीरस्थळी वेळेत उपस्थित ठेवावे तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांना लेखीस्वरूपात कळविण्यात यावे.
त्यानुसार सर्व मुख्याध्यापकांनी विशेष गरजा असणाऱ्या जे संदर्भित विद्यार्थी आहेत. त्यांना वरील कोष्टकात दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे शिबीरस्थळी वेळेत उपस्थित ठेवावे. एक हि दिव्यांग विद्यार्थी शिबिरापासून वंचित राहणार नाही यांची नोंद घ्यावी.