BLO शी संपर्क साधण्यासाठी सोपी युक्ती | Call book करा अशा पद्धतीने

BLO शी संपर्क साधण्यासाठी सोपी युक्ती | call book करा अशा पद्धतीने या विषयी सविस्तर महिती.

सर्वांना माहित आहे की, भारत निवडणूक आयोगाकडून नजीकच्या कालावधीमध्ये मतदार यादी विशेष सखोल पुर्नरीक्षण कार्यक्रम SIR घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून बीएलओ यांना मतदारांनी संपर्क साधने खूप महत्त्वाचे झालेले आहे. आपल्या मतदार यादीचा बीएलओ कोण आहे याबाबत मतदारांना कल्पना नसते, त्यांचा संपर्क नंबर सहजासहजी मिळण्यासाठीभारत निवडणूक आयोगाने एक ॲप तयार केलेले आहे. त्या अँप चे नाव आहे ECINET. हे ॲप लॉगिन केल्यानंतर ची प्रक्रिया अशी आहे.

Login
लॉग इन केल्यानंतर
Voter service
या टॅब वर क्लिक केल्यावर
दहा चौकोनी बॉक्स मध्ये टॅब ओपन होतील.

त्यातील
Book a call with BLO
या टॅब वर क्लिक करा.

या टॅब वर क्लिक केल्यावर
परत तीन पर्याय उपलब्ध होतील
पहिला पर्याय Voter Id
दुसरा पर्याय Reference No.
तिसरा पर्याय I don’t have both

यातील तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता.
यातील पहिल्या पर्यावरण आपण क्लिक करूया

हे ही वाचा: 2002 मतदार यादीशी आपले नाव मॅप झाले आहे का ? विशेष मोहीम

पहिला पर्याय आहे Voter Id

यावर क्लिक केल्यावर वोटर आयडी वरील 10 अक्षर युक्त अंकांचा Id  मजकूर टाका.

खाली सबमिट बटनावर क्लिक केल्यावर

एक पेज ओपन होईल. त्यावर BLO चा यादी भाग नंबर प्रदर्शित होईल. त्याचबरोबर मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता प्रदर्शित होईल.

त्याच्याखाली मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय आहे. या पर्यावर आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाकावा. त्यानंतर खाली सेंट ओटीपी या बटणावर क्लिक करा.

या बटनावर क्लिक केल्यावर एक ओटीपी तुमच्या मोबाईल च्या मेसेज वर येईल.

त्यानंतर तुम्हाला हा मोबाईल नंबर स्वतःचा आहे की शेजाऱ्याचा आहे असे दोन पर्याय येतील.

हे ही वाचा: महाराष्ट्रातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी सह सरकारची महत्त्वाची घोषणा.

त्यावर आपण ज्यांचा मोबाईल नंबर आहे त्यावर क्लिक करायचा आहे.
आता आलेला ओटीपी समोर दिसणाऱ्या सहा बॉक्स मध्ये टाकायचे आहे.

त्यानंतर खाली एक पर्याय दिसेल
Request Call Back
या पर्यावर क्लिक करायचा आहे.

आपली विनंती यशस्वीपणे पाठवण्यात आलेली आहे असा मेसेज स्क्रीनवर दिसतो.

यानंतर आपला कॉल बुक झालेला बीएलओच्या ॲपवर दिसणार आहे. तीन दिवसाच्या आत तुम्हाला संपर्क करणार आहे.

अशा पद्धतीने BLO कॉल आपण घरबसल्या बुक करू शकतो आणि मतदार यादी संदर्भात माहिती पुरावे कागदपत्रे संपर्कात राहून देऊ शकतो.

Leave a Comment