शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मनपा शिक्षण विभागाची शिक्षण परिषद संपन्न

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची सप्टेंबर महिन्याची शिक्षण परिषद शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे दुपारी 11 ते 2 या वेळेत पार पडली. प्रत्येक महिना अखेरीस या शिक्षण परिषदेचे आयोजन केंद्र समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असते. यावेळी हे नियोजन नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग पातळीवर करण्यात आले होते.

हे ही वाचा : मुख्याध्यापक सोनजी गवळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

शिक्षणातील नवप्रवाह समजून घेऊन आपल्या केंद्रातील आपापल्या कार्यरत शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे हा या परिषदेचा उद्देश असतो. यासाठी प्रत्येक महिनाअखेरीस या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळे शिक्षकांमध्ये सुसंवाद निर्माण होऊन विचारांचे आदान प्रदान होते. याचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी होत असतो.

शिक्षणाधिकारी बी.टी पाटील शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना

हे ही वाचा : Good touch, bad touch : विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी परिषद

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.

शिक्षण परिषदेचे वेळापत्रक अशा प्रकारे होते.

प्री टेस्ट भरणे – पाच मिनिटे, प्रास्ताविक व मागील शिक्षण परिषदेतील विषयाचा आढावा यासाठी दहा मिनिटे होती. ओपनिंग ऍक्टिव्हिटी साठी दहा मिनिटे होती. पी. जी. आय व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण ; चर्चा आणि कृतीसाठी 75 मिनिटे होती. संख्या संबोध ; चर्चा आणि कृती साठी 75 मिनिटे होती, पोस्ट टेस्ट भरणे यासाठी पाच मिनिटे होती.

शिवाजीनगर येथील कार्बन नाका येथील शाळेतील शिक्षक संतोष गंगावणे मार्गदर्शन करत असताना

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदेमध्ये विभागाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी मनपा शिक्षकांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्याप्रती, आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहिले पाहिजे. शिक्षकांनी कर्मयोगी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. आपल्याला ज्या कामासाठी नेमले आहे ते काम आपण प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे असे ते बोलत होते. 98% लोक चांगले काम करतात, परंतु दोन टक्के लोक अजूनही चांगले काम करत नाहीत असे ते बोलत होते. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचा गुणवत्ता आलेख अतिशय वरच्या थराला गेला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे असे ते बोलत होते. शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी गीतेतील अनेक दाखल्यांचा व संदर्भांचा उल्लेख केला. गीतेचा सर्व शिक्षकांना अभ्यास असला पाहिजे आणि गीतेनुसार आपले आचरण सुद्धा चांगले असले पाहिजे असे ते बोलत होते. शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांचे वक्तृत्व आणि शिक्षकांचा संपर्क या मधून त्यांना आलेला अनुभव अतिशय मोठा असल्याचे जाणवत होते.

जवळजवळ तीन तास चाललेल्या या मार्गदर्शनामध्ये शिक्षकांना त्यांनी कधी खळखळून हसवले तर कधी त्यांच्या कामाप्रती जाणीव करून गांभीर्य समजावून सांगितले. त्यांचे वक्तृत्व अगदी झोपाळ्यासारखे वाटत होते. शिक्षकांच्या चांगल्या कामाचे त्यांनी कौतुक केले आणि कामामधील उणीवा सुद्धा दाखवल्या. एकंदरीत शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांचे मार्गदर्शन आणि त्यांची वक्तृत्व शैली नक्कीच शिक्षकांना आवडणारी होती हे सभागृहातील निरीक्षणावरून वरून लक्षात येत होते.

शिवाजीनगर,कार्बन नाका शाळा येथील उपशिक्षक संतोष गंगावणे, उपशिक्षक कमलेश खैरनार आणि उपशिक्षक रत्नेश चौधरी यांचा सक्रिय सहभाग या शिक्षण परिषदेमध्ये होता. केंद्र समन्वयक ईश्वर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या शिक्षण परिषदेला नाशिक शहरातील सर्व मनपा शाळांचे सर्व शिक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर केंद्र क्रमांक 21 विश्वास नगर चे केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे सह इतर केंद्राचे केंद्र समन्वयक व मुख्याध्यापक या कार्यक्रमास उपस्थित होते.

शिक्षण परिषद अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Leave a Comment