गणेश उत्सव 2023 नाशिक महानगरपालिका गणेशभक्तांना अत्यंत महत्वाचे आवाहन केलेले आहे ते काय आहे खाली पाहूया.
नाशिक- पुणे – मुंबई या हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणास औद्योगिक त्रिकोण असे बोलले जाते.त्यामुळे या तीन शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. येथील महानगरपालिकाना सण,उत्सव,समारंभ यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.प्रदूषण होऊ नये यासाठी या महानगरपालिका लोकांना नेहमी आवाहन करत असतात.असेच एक आवाहन गणेश उत्सव 2023 च्या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेने केले आहे ते काय आहे आता आपण पाहुया.Ganesh Utsav 2023 Nashik Municipal Corporation: Appeal to Ganesha Devotees
हे ही वाचा
पाणीपुरी मशीन : मराठी उद्योजकाने बनवले, छोट्या उद्योगातून जास्त नफा !
गेल्या काही वर्षापासून नाशिक शहराची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्यानुसार दरवर्षी श्री गणेशाची प्रतिष्ठापना मोठया प्रमाणात दिसून येत आहे. कला, संस्कृती, परंपरा आणि एकोपा याचं प्रतिक म्हणून श्रीगणेशोत्सवाकडे पाहीले जाते.
सन २०२३ श्री गणेशोत्सव हा पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा व्हावा अशी नाशिक महानगरपालिकेचीधारणा आहे. त्यामुळेच समस्त गणेश भक्तांना जाहीर आवाहन करण्यात येते की, प्रदुषण टाळा आणि पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, पी.ओ. पी. च्या श्री गणेश मुर्तीचा वापर टाळा व त्याऐवजी शाडु मातीच्या श्री गणेश मुर्तीचा वापर करा. पी. ओ.पी.ची श्री गणेश मुर्ती आणलीच, तर तिचे अमोनियम बायोकार्बोनेटच्या मिश्रणामध्ये घरच्या घरी विसर्जन करा.
अमोनियम बायकार्बोनेट पावडर ही नाशिक महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात “विनामुल्य” उपलब्ध असुन आपण खालील दर्शविलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधुन श्री गणेश विसर्जनाकरीता अमोनियम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करुन घेऊन श्री गणेश विर्सजन कार्यपध्दती जाणून घ्यावी.
हे ही वाचा
पी एम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेमार्फत प्रथम 10 हजार रुपये
निर्माल्य नदीमध्ये न टाकता, निर्माल्य कलशाचा उपयोग करा व नदीचे प्रदुषण टाळा. तसेच थर्माकॉल व प्लॉस्टिकचा वापर टाळा असे आवाहन नागरीकांना करण्यात येत आहे.
विनामुल्य अमोनियम बायकार्बोनेट पावडरसाठी संपर्क