Good touch, bad touch : विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी परिषद संपूर्ण सविस्तर माहिती.
विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजना संदर्भात “गुड टच आणि बॅड टच” शिकवण्याच्या पध्दती विषयावर आज ४ सप्टेंबर रोजी परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि , ४ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी-५.४५ वाजता शंकराचार्य हॉल, गंगापूर रोड, नाशिक येथे विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजना संदर्भात “गुड टच आणि बॅड टच” शिकवण्याच्या पध्दती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादास नाशिक शहरातील अधिनस्त शाळांमधील मुख्याध्यापक व एक शिक्षक उपस्थिती अनिवार्य असणार आहे.
हेही वाचा : 2023-24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.
सदर परिसंवाद बाल अत्याचार रोखण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. शिक्षकांना मुलांना योग्य मार्गदर्शन कसे करावे याबाबत सखोल माहिती मिळेल, परिसंवादाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बालसुरक्षा, संवेदनशीलता आणि कायदेशीर जागरूकता याबाबत प्रशिक्षित करणे आहे.
शाळांनी विद्यार्थ्यांच्या शारिरीक आणि मानसिक सुरक्षिततेसाठी या महत्वाच्या विषयावर जागरूक राहणे अत्यावश्यक आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविधस्तरावर “सखी सावित्री” समित्या गठीत करणेबाबतच्या शासन निर्णयातील सर्व मुद्दयांवरील अंमलबजावणीसाठी होणे आवश्यक आहे, त्यामुळे सर्व अधिनस्त शाळेतील मुख्याध्यापक व एका शिक्षकांनी या परिसंवादात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे.
सदर परिसंवादात खालील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
- पोलिस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक,
- शिक्षण उपसंचालक श्री. बी. बी. चव्हाण,
- शिक्षण तज्ञ श्री. सचिन, श्रीम. उषा विलास जोशी,
- बालरोगतज्ञ डॉ. तृप्ती महात्मे,
- होमिओपॅथी मानसोपचार तज्ञ डॉ. वृषणीत सौदागर या सर्व मान्यवरांची मुलाखत रेडिओ मिर्चीचे श्री. आर. जे . भूषण घेणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी नाशिक शहरातील अधिनस्त सर्व शाळेतील मुख्याध्यापक व एक शिक्षक उपस्थिति राहतील यासंदर्भात शालेय स्तरावरून आदेश देण्यास कळविण्यात आले आहे.