शाळेत उपस्थित राहण्यापासून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सवलत देणे या विषयी सविस्तर माहिती
राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत विनंती केली आहे.
प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात खालील सुचना देण्यात येत आहेत.
हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 गणित विषय
१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात येत आहे.
२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास. विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 मराठी विषय
३) आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी.