शिक्षण परिषद : सातपूर विभागात समूहसाधन केंद्र क्रमांक 21 व 14 ची शिक्षण परिषद संपन्न

शिक्षण परिषदेबाबत महत्वाची माहिती या लेखात !

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील गट साधन केंद्र क्रमांक १  मधील केंद्र क्रमांक 21 विश्वास नगर व केंद्र क्रमांक 14 कामगार नगर यांच्या संयुक्त सहभागातून ७ ऑगस्ट 2024 रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक 21, शिवाजीनगर कार्बन नाका येथील शाळेमध्ये शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. 

जिल्ह्यात समूह साधन केंद्र स्तरावर शिक्षणातील नऊ प्रवाह समजून केंद्राअंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी करावयाचे प्रयत्न संदर्भात शिक्षकांमध्ये परस्पर संवाद घडून यावा यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात यावे असे शासनाचे आदेश आहेत. 2024 -25 या शैक्षणिक वर्षात पहिल्या शिक्षण परिषदेचे आयोजन  जिल्हास्तरावर 31 जुलै 2024 रोजी पार पडले. तालुकास्तरावर १ ऑगस्ट ते २ ऑगस्ट 2024 रोजी पार पडले. केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात यावी असे परिपत्रकामध्ये म्हटले होते .

हेही वाचा : नाशिक महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार 2023-24 चे निकष व प्रस्तावा बाबत महत्वाची माहिती

केंद्रस्तर शिक्षण परिषद वेळापत्रक खालील प्रमाणे होते.

 प्रास्ताविक- पाच मिनिटे, ओपनिंग ऍक्टिव्हिटी- दहा मिनिटे, सत्र एक : मजकूर समृद्ध वातावरण ( भाषा -प्राथमिक)- 45 मिनिटे, सत्र दोन:  संख्या पूर्वतयारी आणि संख्याज्ञान ( गणित- प्राथमिक)  सोबत पीपीटीचे ही सादरीकरण होते.

शिक्षण परिषद हे शिक्षकांचे सातत्यपूर्ण सर्वंकष शिक्षण घडवून आणण्याचे एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे. शिक्षण परिषदेमध्ये अध्ययन अध्यपन प्रक्रियेसाठी उपयुक्त असे विषय घेतले जातात. त्यामुळे शिक्षकांना वर्गात मुलांना अधिक चांगले शिकवण्यास मदत होते तसेच विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता बांधणीस देखील मदत होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे यांनी केले, “मुख्यमंत्री माझी  शाळा सुंदर शाळा” या उपक्रमाबद्दल शाळांना त्यांनी सूचना दिल्या, शालेय गुणवत्ता या विषया वर त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर ओपनिंग ऍक्टिव्हिटी उपशिक्षक रमेश भोये यांनी घेतली. या ओपनिंग ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी सर्वांना गाण्यावर नाचण्यास प्रवृत्त केले आणि  शैक्षणिक वातावरण निर्माण केले.

 उपशिक्षक संतोष गंगावणे यांनी  मजकूर समृद्ध वातावरण ( भाषा ) या विषयावर मार्गदर्शन केले,संख्या पूर्वतयारी आणि संख्याज्ञान ( गणित प्राथमिक) या विषयावर उपशिक्षक कमलेश खैरनार यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.महाराष्ट्र गीताला  संगीत साथ दिली उपशिक्षक विलास गावित यांनी. मनपा शाळा क्रमांक 21 शिवाजीनगर कार्बन नाका या शाळेतील विद्यार्थिनींनी  इतरही गीते सादर केली.

सर्व मार्गदर्शकांचे केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर करण्यात आलेले होते. शिक्षण परिषदेला  केंद्रातील  सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते.. शिक्षण परिषद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे शिक्षण परिषद पार पडली.

शिक्षण परिषदेच्या दिवशी  सर्व शाळा नियोजनाप्रमाणे भरवण्यात आल्या होत्या..

Leave a Comment