“हर घर तिरंगा” हा उपक्रम कसा राबवायचा ? कालावधी,वेळापत्रक
भारताचा स्वतंत्र दिन १५ ऑगस्ट रोजी येत असून त्या पार्श्वभूमीवर दर वर्षीप्रमाणे यावर्षी ही हर घर तिरंगा” या उपक्रमाची अमलबजावणी करण्यात यावी असे शासनाचे आदेश आहेत.याचाच भाग म्हणून
दिनांक ०९ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट २०२४ या कालावधीत “हर घर तिरंगा” हा उपक्रम यशस्वीपणे राबविणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांनी खालीलप्रमाणे “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात यावा असे सूचित करण्यात येत आहे.
हे ही वाचा : जागतिक आदिवासी दिन : धृवनगरच्या नाशिक मनपा शाळेत मोठ्या उत्साहात साजरा.
1) दिनांक ०९ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट २०२४ या कालावधीत सर्व शिक्षकांनी नागरिकांमध्ये हर घर तिरंगाबाबत जनजागृती करावी. तसेच सोशल मिडीयाव्दारे उपक्रमांना प्रसिद्धी द्यावी आणि इतर उपक्रम जसे कथा-कथन, नाटिका, गीतगायन, पोस्टर्स, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घ्याव्यात. वक्तृत्व व निबंध स्पर्धेकरीता देशातील प्रमुख क्रांतीवीर, राज्यातील प्रमुख क्रांतीवीर व नाशिक जिल्हयातील प्रमुख क्रांतीवर या तीन विषयांचा समावेश असावा .
2) दि. १५ ऑगष्ट रोजी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापकम, शिक्षक व इतर कर्मचारी, शालेय परिसरातील नागरिक यांनी आपल्या घरावर ध्वज सन्मानपूर्वक लावावा तसेच सोबत सेल्फी (Geo Tag सह) घेवून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत.
हे ही वाचा : शिक्षण परिषद : सातपूर विभागात समूहसाधन केंद्र क्रमांक 21 व 14 ची शिक्षण परिषद संपन्न
3) शाळांमधील ध्वज प्लास्टीकचे नसावेत. शाळांतील ध्वज सन्मानपूर्वक व ध्वजसंहितेनुसार संध्याकाळी उतरवावेत. ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) स्वातंत्र्य सैनिक उपलब्ध नसल्यास १९६५, १९७१ व कारगिल युध्दातील लढलेल्या जवानांचा व शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करावा.
4) नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांनी “हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणा-या कार्यक्रमांचे स्पष्ट छायाचित्रे, उपक्रमाचे फोटोग्राफ्स, चित्रफित. व्हिडीओ इ. प्रत्येक शाळेचे दोन छायाचित्र अपलोड करण्यात यावे. प्रत्येक शाळेचा सहभाग अत्यावश्यक आहे.
सदर उपक्रमाचा अहवाल सादर करण्यासाठी आपणास गुगल लिंक यथावकाश मुख्याध्यापक ग्रुपवर पाठविण्यात येईल. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सोबतः- उपक्रमाचे नियोजन जोडले आहे.
दिनांक ०९ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट २०२४ या कालावधीत “हर घर तिरंगा” हा उपक्रम
दि.९ ऑगस्ट २०२४
१. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घ्यावी. (प्रतिज्ञा सोबत जोडली आहे.)
२. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी शालेय परिसारत तिरंगा रॅली काढण्यात यावी.
दि. १० ऑगस्ट २०२४ ते दि. ११ ऑगस्ट २०२४
१. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी शालेय परिसारत तिरंगा यात्रा काढण्यात यावी.
दि. १२ ऑगस्ट २०२४
२. आपल्या शालेय स्तरावर तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करावे.
१. आपल्या शालेय स्तरावर तिरंगा कॅनव्हॉस आयोजन करावे. २. कथा-कथन, नाटिका, गीतगायन स्पर्धांचे आयोजन करणे.
दि. १३ ऑगस्ट २०२४
१. पोस्टर्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजन करणे.
दि. १४ ऑगस्ट २०२४
१. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी तिरंगा शालेय परिसारत तिरंगा यात्रा काढण्यात यावी.
२. तिरंगा मेळा आयोजित करणे.
दि. १५ ऑगस्ट २०२४
१. प्रभात फेरीचे आयोजन करणे.
२. शालेय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
३. १५ ऑगस्ट रोजी तिरंगा सेल्फीज घेवून वेबसाईट वर अपलोड करणे.