जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 चे ऑनलाईन आवेदन पत्र

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 चे ऑनलाईन आवेदन पत्र या बाबत सविस्तर माहिती.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 चे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू करण्यात आलेले आहे याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय नाशिक जिल्हा परिषद यांचे पत्र नुकतेच निर्गमित झालेले आहे.

या पत्राद्वारे असे कळविण्यात आलेले आहे की इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 चे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरायची आहेत. जे विद्यार्थी विद्यार्थिनी 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे. ज्यांची जन्मतारीख 01 मे 2013 ते 31 जुलै 2015 च्या दरम्यान आहेत व ते नियमित इयत्ता तिसरी आणि चौथी इयत्ता उत्तीर्ण झालेले आहेत तसेच त्यांचे पालक नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी आहे असे विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेसाठी आवेदन पत्र भरण्यासाठी पात्र आहेत.

ऑनलाइन आवेदन पत्र विनामूल्य भरण्यास संबंधित संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्लीच्या http://navodaya.gov.in नवोदय विद्यालय समिती क्षेत्रीय कार्यालय पुणे च्या https://navodaya.gov.in/nvs/ros/Pune/en/home/endex.html तसेच जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव नाशिकच्या https://Navodaya.gov.in/nvs/nvsschoo/Nashik/en/home या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यासाठी अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की नाशिक जिल्ह्यातील आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाच्या तुलनेत संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील क्षेत्रातील शाळांच्या प्राचार्य मुख्याध्यापकांना मागील वर्षापेक्षा जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आवेदन पत्र भरण्यासाठी प्रोत्साहित करावे अशी परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment