भय वाटते जगताना
एकेक पीस गळताना
भय वाटते जगताना
एकेक पीस गळताना 2
नाती अशी दुभंगलेली
स्वतःसाठीच संकोचलेली
स्वतःसाठीच संकोचलेली
एक सांधताना नाते
दुसरे का बरे उसावते
उत्तर याचे शोधतो
जीवन त्यातच मुरवतो
भय वाटते जगताना
एकेक पीस गळताना
एकेक पीस गळताना 2
नाती काही मुखवट्यातली
शोधू कुठे ती नाती मनामनातली
वर्तमानाचे आघात,भूतकाळाचे चटके
मनातील वादळ,भविष्याचे फटके
ऐकणारे भेटतील सारे सोबतीला येतील का रे ?
भय वाटते जगताना
एकेक पीस गळताना
एकेक पीस गळताना 2
माझे मला मीच समजावतो
माझेच माझ्याशी गहरे नाते सांगत राहतो
माझे मला मीच समजावतो
माझेच माझ्याशी गहरे नाते सांगत राहतो 2
धडपडतो कष्टतो,नित्य नियमाने
माझ्यातल्या माझ्याच प्रेरणेने
दुभंगलेल्या दुनियेत एकटा चालतो
माझाच माझ्याशी लढा सांगत राहतो
माझाच माझ्याशी लढा सांगत राहतो
भय वाटते जगताना
भय वाटते जगताना
एकेक पीस गळताना
एकेक पीस गळताना 2