Know Your Army with Bhonsala : कार्यक्रमाची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
महाराष्ट्र शासन, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोंसला) आणि स्कूल ऑफ आर्टिलरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.३० ते रात्री ०९.०० या वेळेत भोंसला मिलिटरी कॉलेज यांच्या ग्राऊंडवर “Know Your Army with Bhonsala” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने विविध उपक्रम नाशिक मनपा शाळेत आयोजित करणेत येणार
१. या कार्यक्रमांतर्गत भारतीय सैन्यदलाबद्दल माहिती तसेच भारतीय सैन्याच्या विविध क्षमतांबद्दल, सेवा, साहस व त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानाबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामान्य नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांना महत्त्व पटवून देणे आणि सर्वामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे हा मुख्य हेतु ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
हे ही वाचा : स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांवर मनपा व नपा क्षेत्रातील शाळांमध्ये बंदी
२. सदर कार्यक्रमात भारतीय सैन्यात कार्यरत असलेले देशसंरक्षणातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, अन्य उपकरणे, कमांडो ऑपरेशन्स, शत्रूच्या परिसरात घुसखोरी, तसेच बचावकार्याचे थरारक प्रात्यक्षिके, थेट सैनिकांशी संवाद साधता येणे, ज्यामधून त्यांचे अनुभव आणि प्रेरणादायक कथा जाणून घेता येते. सैन्याच्या विविध युनिट्सद्वारे देशभक्तीपूर्ण गाणी, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. हे सर्व प्रत्यक्ष पाहण्याची तसेच माहिती मिळविण्याची सर्वांना संधी मिळणार आहे.
हे ही वाचा : Face Reading : व्यक्तीचा चेहरा कसा वाचावा ?
तरी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक शिक्षक, सामान्य नागरिक आणि शिक्षक, शिक्षकेत्तर, कार्यालयीन कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सर्व मुख्याध्यापकांनी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित राहतील असे नियोजन करावे असे मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे. ही एक सर्व पालक, शिक्षक,मुख्याध्यापक यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन या परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.