महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना,नाशिक शहर शाखेने केला समाज रत्न, समाज मित्र,गुणवंत शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांचा पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना,मनपा नाशिक. शाखेच्या वतीने समाज रत्न, समाज मित्र,गुणवंत शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांचा पुरस्काराने सन्मान याबाबत सविस्तर वृत्त असे.

महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, मनपा, नाशिक यांच्या वतीने समाज रत्न, समाज मित्र, गुणवंत शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरवदिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवण्याचे आव्हान केले. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच पायलट,नेव्ही,सायंस्टिक या क्षेत्रात नाव कमवण्याचे आव्हान केले.

हे ही वाचा : जागतिक आदिवासी दिन : धृवनगरच्या नाशिक मनपा शाळेत मोठ्या उत्साहात साजरा.

आदिवासी मुले विविध क्षेत्रात तसेच औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात चमकली पाहिजे अशी आशा व्यक्त केली. पेसा भरती झाली पाहिजे याबाबत मी आग्रही आहे. तुम्ही सुध्दा सर्वांनी एकत्र या असे समाजाला आव्हान केले.भावी पिढीसाठी मार्गदर्शन केले. शिक्षकांविषयी माझ्या मनात खूप आदरभाव आहे असे मत ही व्यक्त केले.

शिक्षकांच्या कडून असेच उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या. तसेच नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर व्यवसायिक,औद्योगिक क्षेत्रात नाव कमवण्याचे आव्हान केले. शिक्षकाप्रती आदर असून संसदेमध्ये पहिल्याच भाषणात पेन्शन संदर्भात मी आवाज उठवला असे ते बोलत होते. संघटनेने समाज रत्न, समाज मित्र,गुणवंत आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला याबाबत संघटनेचे कौतुक केले.

हे ही वाचा : 78 वा स्वातंत्र्य दिन नाशिक महानगरपालिका धृवनगर शाळा क्रमांक 22 मध्ये उत्साहात संपन्न

माजी महापौर रंजनाताई भानसी यांनी सांगितले की मुलांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन विविध क्षेत्रात करिअर, प्रगती करावी असे आव्हान करून संघटनेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करत असतांनाच सांगितले की आदिवासी हे दयाळू,मायाळू,आज्ञाधारक,कष्ट करणारे,प्रामाणिकपणा हे गुण त्यांच्यात आहेत असे सांगून संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती मामा तळपाडे यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.संघटनेचे शहराध्यक्ष धर्मेंद्र बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेने केलेल्या कामांची माहिती कार्यक्रमात दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे पदाधिकारी हरीचंद्र भोये यांनी केले व कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड संघटनेचे सरचिटणीस शिरीष पाडवी यांनी केली. सर्वांच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश तळपे यांनी अनुमोदन दिले व संघटनेचे पदाधिकारी नामदेव ठाकरे  यांनी सर्वांचे आभार मानले.

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अतिथी प्रमुख पाहुणे दिंडोरीचे आमदार, विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नरहरी झिरवाळ,दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे,मनपा नाशिक माजी महापौर रंजनाताई भानसी, नाशिक शहराचे पो.उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील,संघटनेचे उपाध्यक्ष.मोतीराम पवार,जिल्हा अध्यक्ष.निवृत्ती मामा तळपाडे,नाशिक शहर अध्यक्ष धर्मेंद्र बागुल, संघघटनेचे पदाधिकारी हरीचंद्र भोये,भाऊसिंग जाधव,अंकुश तळपे,शिरीष पाडवी, श्रीम.जयश्री ढोले,सुभाष भोये,मधुकर देसाई,चिंतामण साबळे,देविदास सोनवणे, रामदास तळपे व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पो.उपायुक्त चंद्रकांत खांडवी व बिरसामुंडा मेडिकल हबचे डॉ.साहेबराव झिरवाळ  यांना समाज रत्न पुरस्कार व मनपा शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील आणि सामाजिक चळवळीचे प्रणेते करूणासागर पगारे ( दादा ) यांना समाज मित्र पुरस्कार व सुनंदा सोमनाथ चौधरी, कृष्णा शंकर महाले,श्रीम.जयश्री रामदास देशमुख,रंजना मल्हाजी शेडमाके,हिरामण पांडू चव्हाण,सोमनाथ जाणू गावित संतोष मुरलीधर डगळे,रघुनाथ आवजी गुंबाडे नारायण गंगाधर धनगरे,रत्नाकर नंदू गवारी विठ्ठल निवृत्ती नागरे नितीन दिगंबर चौधरी,अमित तानाजी शिंदे,योगिता रितेश बच्छाव.यांना मनपाचा उपक्रमशील,गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ, रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच १० वी,१२वी, एम.बी.बी.एस,एम.पी.एस सी. उत्तीर्ण असे गुणवंत विद्यार्थ्यांचे देखिल मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्त्यावर वर ठेका धरला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी सुनिल गावित, मंगेश महाले, मधुकर देसाई, निलेश ठाकरे, संजय चौधरी, सिताराम आहेर, रत्नेश चौधरी, दिनकर भुसारे,संजय ठाकरे, युवराज ठाकरे,विलास गावित जालिंदर ठाकरे, संजय अहिरे,भगवंत राऊत, प्रविण गांगोडे, सुनिल ठाकरे, जयवंत पालवी,किरण पवार, नामदेव बागुल, नामदेव चौरे, ओंकार चौरे, ईश्वर चौरे, पंढरीनाथ भांगरे सौ. सुवर्णा जोपले, सौ.मनिषा चौरे, सौ.रेखा गवळी, श्रीम.रोहिणी धुम, श्रीम.मिनाक्षी वसावे या सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्त्यावर ठेका धरला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी सुनिल गावित, मंगेश महाले, मधुकर देसाई, निलेश ठाकरे, संजय चौधरी, सिताराम आहेर, रत्नेश चौधरी, दिनकर भुसारे,संजय ठाकरे, युवराज ठाकरे,विलास गावित जालिंदर ठाकरे, संजय अहिरे,भगवंत राऊत, प्रविण गांगोडे, सुनिल ठाकरे, जयवंत पालवी,किरण पवार, नामदेव बागुल, नामदेव चौरे, ओंकार चौरे, ईश्वर चौरे, पंढरीनाथ भांगरे सौ. सुवर्णा जोपले, सौ.मनिषा चौरे, सौ.रेखा गवळी, श्रीम.रोहिणी धुम, श्रीम.मिनाक्षी वसावे या सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

Leave a Comment