शिवाजीनगर मनपा शाळा क्र. 35 मध्ये विद्यार्थिनींनी बनवले हातातील ब्रेसलेट ! दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत व्यावसायिक शिक्षण ! अनोखा उपक्रम
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी .टी.पाटील यांच्या संकल्पनेतून दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात येत असतो.त्या अंतर्गत शाळेत विविध क्षेत्रातील उपक्रम आयोजित करण्यात येत असतात.
हे ही वाचा : “सखी सावित्री” शालेय शिक्षण विभागाच्या समिती बाबत थोडक्यात माहिती
हे ही वाचा : कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार ? RBI चा नियम.
हे ही वाचा : राज्यातील शाळांमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान
हे ही वाचा : राज्यातील शाळांमध्ये मिळणार उकडलेली अंडी !
शनिवार दप्तरमुक्त असल्याने हा दिवस मुलांसाठी एक आनंदाचा दिवस असतो.काहीतरी नवीन शिकायला मिळते ही भावना पालक आणि मुलांमध्ये असते.खरे म्हणजे कामात बदल केल्याने एक प्रकारची उर्जा मिळते अशी भावना मनपातील सर्व शिक्षक यांची असते.अध्ययन आणि अध्यापन हे काम मात्र शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अविरत चालूच असते.दोघांसाठी दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम अतिशय लाभदायी आहे.
नाशिक महानगरपालिकेची शाळा क्रमांक. 35 ( मुली ) शिवाजीनगर सातपूर येथे अनेक प्रकारचे उपक्रम साजरे करण्यात येत असतात त्यातलाच एक उपक्रम म्हणजे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत व्यवसायिक शिक्षण हा होय.त्यामध्ये इयत्ता 5 वी तुकडी (अ) मधील विद्यार्थिनींनी हातातील ब्रेसलेट तयार केले. हा उपक्रम मनपा शाळा क्रमांक 35 ( मुली ) कार्बन नाका शिवाजीनगर सातपूर येथे संपन्न झाला.
दिनांक २/१२/२०२३ रोजी मनपा शाळा क्रमांक 35 (मुली ) शिवाजीनगर सातपूर येथे मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी .टी .पाटील यांच्या संकल्पनेतील दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत ब्रेसलेट बनवणे हा उपक्वम वर्गशिक्षक उमेश महाले तसेच मुख्याध्यापक सुनील बोरसे व इतर शिक्षक यांच्या मार्गदर्शनांनी आणि प्रेरणेने संपन्न झाला.
ब्रेसलेट बनवणे व्यावसायिक शिक्षण उपक्रम अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींना सदर उपक्रमाच्या तयारीसाठी दोन आठवडे वेळ देण्यात आला होता. वर्गात प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी वेगळ्या कलांमध्ये. फक्त त्यांना वारंवार संधी देऊन त्यांना पुढे आणता येते.आपल्यामध्ये आत्मसात असलेले कला व गुण दाखवण्याची संधी विद्यार्थ्याना देणे आवशयक असते. अभ्यासाबरोबर अशा ही उपक्रमांची जोड देऊन त्यांना पुढे आणता येते.