नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वैळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरविणेबाबत प्राधान्याने महत्वाच्या बाबी समोर आलेल्या आहे. त्या बाबीच्या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
हे ही वाचा : जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल | केंद्राकडून आली सूचना
1) राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यस्थापानच्या ज्या शाळाची पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजता किंवा त्यानंतर असणार आहे. त्या शाळांची नवीन शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी (इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत) पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर असावी असे म्हंटले आहे.
2) शाळेच्या वेळेत बदल करतांना बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा-2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यायची आहे .
हे ही वाचा : सायबर गुन्ह्याबाबत महत्वाची माहिती
3) पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी (इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत) वर्ग दुपार सत्रात भरविण्यात यावेत तसेच इयत्ता 5 वी ते 7 वी 8 वी पर्यतचे वर्ग सकाळ सत्रात भरविण्यात यावेत.
4) शासन निर्णयाची अंमलबजावणी करतांना कोणत्याही प्रकारची तक्रार या कार्यालयास प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सूचनांचे पालन शाळा करतील याबाबतची दक्षता केंद्र प्रमूख यांनी घ्यावी. कार्यालयीन परिपत्रकाची काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात यावी.