Std 5th and Std 8th शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज
(Std 5th and Std 8th ) राज्यात प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्षात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) Std 5 th and std 8 th ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदे मार्फत घेण्यात येत असते.या वर्षी सुद्धा त्याचप्रमाणे ही परीक्षा घेण्यात येणार आहे.सर्वात शेवटी शाळा नोंदणी कशी करावी आणि online फॉर्म कसे भरावे याबाबत संपुर्ण माहिती दिलेली आहे वाचा. Pre-Higher Primary Scholarship Examination (Ed. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (Ed. 8th)
हे ही वाचा
त्यासाठी online प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांचे कडील पत्राने कळविण्यात येत असून सदर अधिनस्त कार्यालयांनी त्याबाबत परीपत्रके जारी केली आहेत.महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक अंतर्गत मा.प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांनी आपल्या अधिनस्थ शाळांना याबाबत अवगत केलेले आहे कि, मनपा शिक्षण विभागातील शाळांच्या
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदे मार्फत घेण्यात येणा-या इ. 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विदयार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा मनपा शिक्षण विभाग अंदाजपत्रकिय तरतुदीतुन करण्यात येणार असल्याचे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. Pre-Higher Primary Scholarship Examination (No. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (No. 8th)
हे ही वाचा
आता या कर्मचाऱ्यांना मिळणार CMP प्रणाली द्वारे वेतन | परिपत्रक निर्गमित
वरील विषयान्वये कळविण्यात येते कि, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) फेब्रुवारी 2024 परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावर दि.01/07/2023 पासुन शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार होती. तथापि काही तांत्रिक व प्रशासकिय कारणांमुळे सदर सुविधा दि.01/07/2023 ऐवजी दि. 01/09/2023 रोजी पासुन सुरु करण्यात येणार आहे.
मनपा प्राथमिक शाळांमधील विदयार्थ्यांच्या परीक्षेचे सर्व शुल्क, शाळा संलग्नता फी मनपा शिक्षण विभाग अंदाजपत्रकिय तरतुदीतुन भरण्यात येणार असल्याने इ. 5 वी 8 वी मध्ये शिकणा-या जास्तीत जास्त विदयार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहीत करुन जास्तीत जास्त विदयार्थी परीक्षेस प्रविष्ठ करावे.
हे ही वाचा
Table of Contents
तसेच विदयार्थ्यांच्या गुणवत्ता विकासा करीता सातत्याने मार्गदशर्न करावे.महानगरपालिका शिक्षण विभागाने हा एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे.महानगरपालिका शाळांमध्ये जे विद्यार्थी येतात ते अतिशय सामान्य परिस्थितीतून येतात. इच्छा असून सुद्धा काही मुले फी अभावी शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकत नाहीत.त्यामुळे अतिशय चांगला निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे असे म्हणावे लागेल.
शाळा नोंदणी कशी करावी आणि online फॉर्म कसे भरावे याबाबत संपुर्ण माहिती