नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्याबाबत सविस्तर माहिती
Table of Contents
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि.०३/०३/२०२४ रोजी राबविणेत येणार असून सदर मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील एकूण एक बालकास लसीकरण करणेत येणार आहे याबाबत सविस्तर माहिती काय आहे ते पाहू.
१. दि.०३/०३/२०२४ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविणेत येणार असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी पल्स पोलिओ लसीकरणाचा संदेश पाठवावा असे मनपा शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांनी परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे. तसेच प्रार्थनेच्या वेळी पल्स पोलिओ मोहिमेची तारीख विद्यार्थ्यांना सांगण्यात याव्यात असे परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
हे ही वाचा: शिवजयंती : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न
२. शाळेच्या नोटीस बोर्डवर पल्स पोलिओ मोहिमेची तारीख लिहण्यात यावी अशी सूचना आहे.
३. ज्या शाळेमध्ये लसीकरण बुथ आहे, दरवर्षीनुसार त्यांनी सदर दिवशी लसीकरणाकरीता शाळा उपलब्ध करुन द्यावी. सकाळी ८.०० वाजता बुथ उघडले जाईल याविषयी काळजी घ्यावी. ब-याच ठिकाणी त्या रुमची चावी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे सकाळी ८.०० वाजता बुथ सुरु होत नाही असे होऊ नये याची काळजी घ्यावी असे म्हंटले आहे.
४. सर्व शिक्षकांनीही आपआपल्या घराभोवती याबाबत प्रसिध्दी द्यावी.
५. मनपा क्षेत्रातील खाजगी शाळा, विना अनुदानीत शाळा व अनुदानीत शाळा यांनी पल्स पोलिओ मोहिमेसाठी सहकार्य करावे.
मोहिम दि. ०३/०३/२०२४ रोजी राबविणेत येणार असून आपल्या अमुल्य सहकार्याची येणार अत्यंत गरज आहे. सदर मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण एक बालकास लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
हे ही वाचा: इयत्ता 5 वी व 8 वी वर्गासाठी मूल्यमापना बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती
नाशिक महानगरपालिकेतर्फे पल्स पोलिओ बाबत कृतिनियोजन तयार करणेत आले असून एकूण ९८३ लसीकरण बुथवर लसीकरण करण्यात येणार आहे. तरी सदर राष्ट्रीय कार्यक्रमास खालीलप्रमाणे आपले अमूल्य सहकार्य द्यावे ही अपेक्षा !
१. प्रत्येक शाळेत पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि. ०३/०३/२०२४ ही तारीख कळवावी व प्रत्येक विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी पल्स पोलिओ लसीकरणाचा संदेश पाठवावा. प्रार्थनेच्या वेळी पल्स पोलिओ मोहिमेच्या तारीख विद्यार्थ्यांना सांगण्यात याव्यात.
२.शाळेच्या नोटीस बोर्डवर पल्स पोलिओ मोहिमेच्या तारख लिहण्यात याची.
३. ज्या शाळेमध्ये लसीकरण बुथ आहे, दरवर्षीनुसार त्यांनी सदर दिवशी लसीकरणाकरीता शाळा उपलब्ध करुन द्यावी. सकाळी ८.०० वाजता बुथ उघडले जाईल याविषयी काळजी घ्यावी. बन्याच ठिकाणी त्या रुमची चावी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे सकाळी ८.०० वाजता बुथ सुरु होत नाही.
४. सर्व शिक्षकांनीही आपआपल्या घराभोवती याबाबत प्रसिध्दी द्यावी.
५ . खाजगी शाळांना सुध्दा पत्र द्यावे.
६ . लसीकरणाच्या दिवशी शिक्षकांनी त्यांचे शेजारील बुथवर हजर राहून जास्तीत जास्त बालकांना डोस पाजण्याकरिता सहकार्य करावे.
तरी कृपया सर्वांनी राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य केल्यास निश्चितच कार्यक्रम यशस्वीरित्या राबविता येऊन पोलिओ या रोगाचे निर्मूलन होईल असे कळविण्यात आले आहे.