नाशिक महानगरपालिका शाळा क्र.71 रायगड चौक सिडको या शाळेचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 71 रायगड चौक सिडको या शाळेचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न सविस्तर माहिती

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 71 रायगड चौक सिडको या शाळेचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न झाले. दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग हिंदुह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी,शाळा क्रमांक 71 रायगड चौक सिडको, नाशिक या शाळेचे स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले.

नाशिक महानगरपालिका शाळा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.टी.पाटील प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग, मनपा नाशिक हे उपस्थित होते.मुख्याध्यापक भास्कर साळवे यांनी प्रास्ताविक करताना शाळेने केलेल्या प्रगतीची माहिती पालकांना दिली. शाळेमध्ये राबविले जाणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा, उपक्रम यांची माहिती त्यांनी दिली.

हे हि वाचा: एस टी महामंडळातील एक आदर्श व्यक्ती : इम्रान मन्सुरी

अध्यक्षीय शुभेच्छा संदेशात शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षणाशिवाय माणसाला उत्तम नागरिक म्हणून जीवन जगता येत नाही . या नव्या जगात जो शिकेल तोच टिकेल आणि तोच पुढे जाईल आणि त्यामुळेच देशाची प्रगती होईल .शिक्षण हा या युगाचा प्राण आहे तुम्ही सर्वांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

त्यांना शालेय वातावरणामध्ये समृद्ध आणि कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्यासाठी उत्साहित केले पाहिजे. आमचे सर्व शिक्षक या कामी सतत प्रयत्न करत असतात. आजच्या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाची मला कल्पना येते.या सुंदर आणि देखण्या इमारतीमध्ये स्वच्छता आणि शिकण्यासाठी चे वातावरण खूपच छान वाटते.

हे हि वाचा: पर्यटनाच्या क्षेत्रात नवा टर्निंग पॉइंट : नाशिकमध्ये ग्लैम्पिंग महोत्सवाचे आयोजन

पालकांची विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची ही मानसिकता.. शिक्षणाचा रथ पुढे नेतील. तेव्हा सर्वांनी आपल्या पाल्याकडे लक्ष द्या. खाजगी शाळेला जास्त फी देण्यापेक्षा आपल्या या सुसज्ज स्मार्ट स्कूलमध्ये आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळते आहे. सर्व गोष्टींची पूर्तता या शाळेत केलेली आहे. या शाळेची भव्य इमारत आणि इथला परिसर खूपच रमणीय आहे.

शाळेला गार्डन,खेळाचे साहित्य, प्रयोगशाळा, संगणक कक्ष,ग्रंथालय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असलेले शिक्षक येथे आहेत, तेव्हा तुम्ही महापालिकेच्या शाळेतच आपल्या मुलांना टाका व आपल्या पाल्यांचा मोफत शिक्षणाचा हक्क त्यांना मिळवून द्या. पुढील काळात याही शाळेतील विद्यार्थी विमानवारीने इसरो या अंतराळ संशोधन केंद्रास भेट देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

मनपा शाळा क्रमांक 70 च्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी यांचा उपक्रम..सात ते नऊ मोबाईल टीव्ही बंद व दप्तर मुक्त शनिवार यावर आधारित नाटिका सादर केली. मोबाईल चे दुष्परिणाम त्यातून पालकवर्गासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी यु.आर.सी 2 चे प्रमुख बाळासाहेब कडलग व यू आर.सी. 1 चे प्रमुख सुनील खेलूकर उपस्थित होते.त्याचबरोबर केंद्र क्रमांक 8 च्या केंद्रप्रमुख वैशाली क्षिरसागर यांनीही पालकांना संबोधित केले.

हे हि वाचा: अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांच्या हस्ते

याप्रसंगी प्रकाश शेवाळे, दीपक पगार, छाया माळी ,बैरागी, साहेबराव महानुभाव आदी केंद्रप्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक दुडे, पद्माकर बागड व इतर शाळातील शिक्षक,शाळा क्रमांक 70 चे सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांचे प्रदर्शन करत विविध वेशभूषा करून आर्केस्ट्रा आणि नाटक यांना लाजवेल असे कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून पालकांना पाहायला मिळाले.

नाटक ,कविता, गायन ,विनोद, जुन्या फिल्मी गाण्यांवर सुंदर नृत्य सादरीकरण करून तीन तास पालकांना खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने परिसरातील पालक या गुणदर्शन सोहळ्यासाठी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मेने, सुवर्णा थोरात आणि शोभा मगर यांनी केले. मुख्याध्यापक साळवे आणि सर्व शिक्षक बाळासाहेब सातपुते, शोभा मगर, किसन काळे, विनोद मेने,वर्षा सुंठवाल, प्रमिला देवरे, योगिता खैरे, योगिता आहिरे, प्राजक्ता महाजन, सूर्यवंशी, कविता वडघुले, संध्या जाधव,कीर्तीमाला भोळे, शैलजा भागवत या शिक्षकांनी स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन शोभा मगर यांनी केले.

Leave a Comment