दि. २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याबाबत सविस्तर माहिती.
Table of Contents
क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
त्यास अनुसरुन राज्यामध्ये साधना सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे असून साधना सप्ताह कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (IGOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) कार्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हे ही वाचा: BLO शी संपर्क साधण्यासाठी सोपी युक्ती | Call book करा अशा पद्धतीने
साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी असे परिपत्रकात म्हंटले आहे.
- सर्व अधिकारी व कर्मचारी (वर्ग १ ते ३) यांनी I GOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील ५० कोर्सेस पैकी किमान ४ कोर्स पूर्ण करावेत व पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असावा. (IGOT पोर्टलवरील आकडेवारीनुसार)
2. सदर कोर्सेस दि.२ एप्रिल ते दि. ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत पूर्ण करावेत.
3.आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी . यांना साधना सप्ताह अंतर्गत सदर
हे ही वाचा: 2002 मतदार यादीशी आपले नाव मॅप झाले आहे का ? विशेष मोहीम
चार (४) तासाचे कोर्स अनिवार्य असुन अधिकारी व कर्मचारी यांनी कोर्सचा अहवाल प्रमाणपत्रासह व सोबतच्या प्रमाणपत्र नमुन्यात माहिती विभागप्रमुख, खातेप्रमुख व विभागीय अधिकारी यांनी इकडील कार्यालयाकडे दि.९ एप्रिल २०२६ पावेतो सादर करावे.
सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. व सदरचा आदेश सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या निर्दशनास आणुन द्यावा.






