नमो चषक 2024 या स्पर्धेसाठी शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करणे या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
“नमो चषक २०२४” करिता नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करणेबाबत महानगरपालिका शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
हे ही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा.
देवयानी सुहास फरांदे, विधानसभा सदस्य, नाशिक (मध्य), महाराष्ट्र यांचे पत्र संदर्भिय विषयान्वये दि. १२ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान “नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आनंद मिळतो त्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग घ्यावे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येतो.
हे ही वाचा: शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?
या चषकामध्ये विविध खेळांचा समावेश असून तो पुढील प्रमाणे:-
- क्रिकेट
- बास्केट बॉल
- कबड्डी
- फुटबॉल
- कॅरम
- खो-खो
- व्हॉलीबॉल
- रस्सी खेच
- बुद्धीबळ
- रनिंग
- कुस्ती
- स्केटिंग
- टेबल टेनिस
- चित्रकला
- रांगोळी
- गीत-गायन
- नृत्य स्पर्धा
- एकांकीका
- वक्तृत्व
वरील स्पर्धा व खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेसाठी स्पर्धकांची नोंदणी दि. २५ डिसेंबर २०२३ पासून सुरु असून ते दि. १२ जानेवारी २०२४ पर्यंत करता येणार आहे.
हे ही वाचा: सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा. या तारखेला स्पर्धा
यासाठी www.namochashak.in या वेबसाईट वरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तसेच उपरोक्त संदर्भिय कार्यालयामार्फत प्रत्येक शाळेला संपर्क साधला जाणार आहेत.
तरी नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याद्यापकांनी सदर “नमो चषक-२०२४” करिता जास्तीत जास्त संघ व वैयक्तिक स्पर्धकांची नोंदणी करावी.