नाशिक महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शन : विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान

नाशिक महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शन : विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान या विषयी सविस्तर माहिती

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने शिक्षण विभाग, नाशिक महानगरपालिका, ऍक्शन एंड संस्था आणि सिमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यामाने जिज्ञासा प्रकल्प नाशिक महानगरपालिकेच्या २० शाळांमध्ये सुरु आहे.

या प्रकल्पांतर्गत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले असून पुढील टप्पा म्हणजे महानगरपालिका स्तरीय विज्ञान प्रदर्शनानुसार सदर संस्थेमार्फत परवानगी मागितली आहे. सदर संस्थेनुसार अटींच्या अधीन राहून दि.२२/०२/२०२४ रोजी प्रदर्शन घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

हे हि वाचा: इंजिनियरिंग मध्ये मराठी भाषा सक्तीची होणार ?

तरी सोबत जोडलेल्या यादीतील शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांना प्रदर्शन स्थळी उपस्थित ठेवावे, विज्ञान प्रदर्शन स्थळी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात येत आहे.

१) विज्ञान प्रदर्शन खर्च म्हणजेच मुलांना लागणारे साहित्य हे संस्थेद्वारे पुरविले जाणार आहे.

२) विज्ञान प्रदर्शनात उत्कृस्ष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार तसेच सर्व महभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हे हि वाचा: ध्रुवनगर मनपा शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्साहात साजरा.

३) सोबत जोडलेल्या यादीतील शाळा व विद्यार्थ्यांनाच सदर ठिकाणी प्रदर्शनात सहभाग नोंदवता येईल.

४) प्रदर्शनाच्या ठिकाणी सहभागी विद्यार्थी त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांसाठी चहा, अल्पोपहार व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे.

स्थळ

रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ नाशिक दिनांक २२/०२/२०२४ वेळ: सकाळी ८ ते दुपारी ३ सोबत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी.

Leave a Comment