नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वीर बाल दिवस साजरा होणार आज !

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वीर बाल दिवस साजरा होणार आज ! याबाबत सविस्तर माहिती

दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवर “वीर बाल दिवस” साजरा करण्याबाबत सूचना नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ना देण्यात आल्या आहेत.

भारताच्या भविष्याचा पाया असलेल्या बालकांना सन्मानित करण्यासाठी दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय पातळवरील “वीर बाल दिवस” साजरा केला जात आहे. यावर्षी वीर बाल दिवसाची संकल्पना “वीरता” असणार आहे. ज्यामध्ये बालकांनी दाखवलेले धैर्य, दया आणि लवचिकता यांचा समावेश आहे. त्यानुषंगाने सदर उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत सर्व शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यांना परिपत्रकाद्वारे सूचित केलेले आहेच.

हे ही वाचा : बाबासाहेब जानकर यांची मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सहसचिव पदी निवड

दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी भारत सरकारचे माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम किशारवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे. दि. १६ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सर्व शाळांमध्ये “वीर बाल दिवस” साजरा करण्यासाठी उपक्रमांची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचेकडून पाठविण्यात आली आहे.

२६ डिसेंबर २०२४ हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यात यावे असे परिपत्रकात नमूद आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांनी दिलेल्या ट्रॅकरमध्ये त्याचा अहवाल भरण्यात येणार आहे

Leave a Comment