स्पेलिंग बी उपक्रम नाशिक महानगरपालिका शाळेमध्ये आयोजित होणार या विषयी सविस्तर वृतांत पुढील प्रमाणे
Table of Contents
इयत्ता १ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेच्या शब्दसंपदावृद्धीसाठी “स्पेलिंग बी” उपक्रम राबविण्यात येणार. नाशिक महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये “स्पेलिंग बी” उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमामुळे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास वाढविणे, इंग्रजी भाषेतील शब्दसंपदा समृद्ध करणे, शुद्ध उच्चार, लेखन कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास, वाचनप्रेम आणि व्यासपीठावर सादरीकरण या उद्देशाने स्पेलिंग बी उपक्रम महत्त्वाचा ठरेल. त्यानुसार, नाशिक महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांनी हा उपक्रम पुढीलप्रमाणे:
हे ही वाचा: Disability: दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवेश व नियमित शिक्षण
उद्दिष्टे :
- विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची शब्दसंपदा वाढविणे.
- इंग्रजी भाषेची भीती दूर करून आत्मविश्वास वाढविणे.
- इंग्रजी उच्चार, लेखन आणि वाचन कौशल्ये विकसित करणे.
- विद्यार्थ्यांची तयारी परीक्षाभिमुख होण्यासाठी प्रेरणा देणे.

शाळा स्तरावर राबविण्याच्या मार्गदर्शक सूचनाः-
- प्रत्येक वर्गात आठवड्याला इयत्ता १ ली ते ६ वीसाठी २५ तर इयत्ता ७ वी ते ८ वीसाठी ४० इंग्रजी शब्दांचा सराव घ्यावा.
- प्रत्येक वर्गात आठवड्याच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वीसाठीच्या शब्दांची pdf “मनपा शिक्षक” ग्रुपला शेअर करण्यात येईल.
- “Flash cards”, “Google Input Tools”, वाचन वह्या व लेखन सरावाचा वापर करावा.
- प्रत्येक शनिवार शाळा स्तरावर देण्यात आलेल्या शब्दांच्या आधारावर आठवड्याच्या शेवटी स्पेलिंग बी स्पर्धेचे (चाचणी/तोंडी/लेखी) शाळेत आयोजन करावे.
- विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल तयार करावा
- उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान करावा.
हे ही वाचा: हरितकुंभ संकल्पनेनुसार नाशिक मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार |
समित्यांची स्थापनाः
शाळा स्तर समितीः अध्यक्ष- मुख्याध्यापक, सदस्य- सर्व शिक्षक
केंद्रस्तर समितीः अध्यक्ष-पर्यवेक्षक, सदस्य केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व स्तरनिहाय एक शिक्षक
मनपास्तर : अध्यक्ष – प्रशासन अधिकारी, सदस्य- पर्यवेक्षक (सर्व), दोन मुख्याध्यापक व स्तरनिहाय प्रत्येकी दोन शिक्षक. स्पेलिंग बी (spelling bee)
समित्यांच्या जबाबदाऱ्या :
अ) शाळा स्तर :
- शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पेलिंग बी पद्धतीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे
- शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी शैक्षणिक साहित्य, कृती कार्यक्रम, उपक्रम इ. चे आयोजन
- दरमहा समितीची बैठक घेणे
- विद्यार्थ्यांना व शिक्षकांना इंग्रजी उच्चारानुसार (Phonetics) प्रशिक्षण
- शाळा स्तरावर स्पेलिंग बी पद्धतीचे आयोजन
- विद्यार्थ्यांच्या सूचना / समस्या जाणून घेऊन उपाययोजना करणे
आ) केंद्र स्तर समिती :-
- दर दोन महिन्यांनी समितीची बैठक
- इंग्रजी उच्चारानुसार प्रशिक्षण
- सर्व विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रोत्साहन
- शैक्षणिक साहित्य, उपक्रमांचे आयोजन
- उत्कृष्ट व अत्युत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव
हे ही वाचा: गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे थोडक्यात !
इ) मनपास्तर समिती :
- दर तीन महिन्यांनी समितीची बैठक
- मनपास्तर स्पर्धेचे आयोजन
- सराव साहित्य व उपक्रम
- गौरव समारंभ
- वर्ड बँक
स्पर्धा प्रकार
- Spelling aloud (शब्द उच्चारून सांगणे)
- Fill in the blanks (रिक्त जागा भरणे)
- Jumble Words (गोंधळलेले शब्द सुलझवणे)
- Word meaning/usage (शब्दाचा अर्थ व वापर)
हे ही वाचा: डिजिटल जनगणना : केंद्र सरकार द्वारे दोन टप्प्यात करण्यात येणार
स्पर्धेच्या फे-यांचे प्रकार :
- पहिली व दुसरी फेरी- पाठ्यपुस्तकातील शब्दांवर आधारित (सोप्याकडून कठीणाकडे) शब्द न समजल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून सांगावा
- रिक्त जागा भरणे (Filling the blanks)
- शब्दांची अडथळा फॉर्म (Jumble word)
प्रत्येक फेरीसाठी – नवीन शब्दाला २ संधी व मागील स्पर्धकाकडून आलेल्या शब्दाला १ संधी देणे.
हे ही वाचा: जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम जुना आणि नवीन ! या विषयी माहिती
सराव कार्यक्रम :
- इंग्रजी पेटीतील साहित्याचा जास्तीत जास्त वापर करणे.
- फ्लॅश कार्डद्वारे शब्द सराव
- Google Input Tools द्वारे उच्चार सराव
- परिपाठाच्या वेळेला गटनिहाय दररोज ५ शब्द स्पेलिंग विचारून सराव
- प्रत्येक शनिवारी शाळास्तरावर स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करणे.
- उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट प्रतिसाद देणाऱ्या विद्यार्थ्याचा गुणगौरव करणे.
- इंग्रजी वाचन आणि लेखनासाठी भक्कम पाया
- इंग्रजी हस्ताक्षर स्पेलिंग चार रेघी वहीत लेखनाचा सराव घेणे.
- जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रोत्साहित करावे.
उदा. – SCRIPPS NATIONAL SPELLING BEE, INDIA SPELLING BEE, WIZ INTERNATIONAL SPELL BEE, ECI SPELLING BEE
तरी, सर्व शाळांनी आपल्या शाळेतील स्पेलिंग बी उपक्रमाचा सविस्तर आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी. सदर उपक्रम विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वृद्धीसाठी उपयुक्त ठरेल.