भव्य माता पालक मेळावा.
Table of Contents
नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी येथे शनिवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भव्य माता पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. माता पालक मेळाव्याचे प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक मा.प्रशासनाधिकारी बी.टी. पाटील हे होते. प्रमुख अतिथी बी.टी. पाटील यांचे स्वागत मुलींनी औक्षण करून केले.त्याचबरोबर लेझीम पथकाने सुद्धा त्यांचे स्वागत उत्साह पूर्ण वातावरणात केले.
शाळेच्या वतीने प्रशासनाधिकारी बी.टी पाटील यांचा सत्कार मुख्याध्यापिका छाया गोसावी व महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सुरेश खांडबहाले यांचे हस्ते शाल, बुके देऊन करण्यात आला. Mata Palak Mela in the presence of Hon’ble Administrator BT Patil in Jijamata Municipal School No. 28 of Satpur Colony
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते : अटी,शर्ती व निकष असे आहेत.
पालक मेळाव्यासाठी उपस्थित माता पालक यांना प्रमुख अतिथी मा.प्रशासनाधिकारी बी.टी पाटील यांनी मार्गदर्शन केले. नाशिक मनपा शिक्षण विभागातील शाळांमध्ये आताच सुरू करण्यात आलेल्या दप्तरविना शनिवार या उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमाचा हेतू पालकांना समजावून सांगितला. तसेच सर्व विद्यार्थी ,पालक, शिक्षक यांनी रोज सायंकाळी 7 ते 9 यावेळेत मोबाइल, टीव्ही बंद ठेवावा या उपक्रमाची माहिती व उद्धेश माता पालकांना सांगितला. मनपा शिक्षण विभागातील प्रत्येक शाळा स्मार्ट स्कुल होत आहे.
त्यासाठी एका शाळेला 1 कोटी इतका निधी मनपा शिक्षण विभागाकडून खर्च केल्यानेच शाळा स्मार्ट होत आहेत,असे ते बोलत होते. त्यामुळे भविष्यात मनपा शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतील असे प्रतिपादन मा.बी.टी पाटील यांनी केले. यासाठी आमचे सर्व मुख्याद्यापक, शिक्षक हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेत आहेत असे ते बोलत होते. Mata Palak Mela in the presence of Hon’ble Administrator BT Patil in Jijamata Municipal School No. 28 of Satpur Colony
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली.पहा कोणत्याही शाळेची वेळ तासिका नियोजनासह.
मनपा शाळा क्रमांक 28 मधील पालक मेळाव्याचे आयोजन व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शाळेतील सर्व शिक्षकांचे मा.प्रशासनाधिकारी यांनी कौतुक केले.पालक मेळाव्यात उपशिक्षक यशवंत जाधव, पुनाजी मुठे, पल्लवी शेवाळे, सोनिया बोरसे, दत्तात्रय शिंपी, कविता शिरोडे यांनी विविध शालेय उपक्रम, विविध शासकीय योजना, गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम, स्मार्ट स्कुल, शिष्यवृत्ती परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
हे ही वाचा
Jio BP petrol pump Dealership मिळवा आणि महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवा. सुवर्णसंधी
कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख नितिन देशमुख, केंद्रप्रमुख,विजय कुवर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा साताळे, उपाध्यक्षा सविता मोरणकर, डीमार्ट सुपरवायझर प्राची माळी, मुख्याध्यापिका छाया गोसावी यावेळी उपस्थित होत्या. पालक मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनासाठी वैभव आहिरे, रेगजी वसावे, सुरेश चौरे, भारती पवार, सोनाली कुवर व शारदा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.