शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते.
Table of Contents
शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेमध्ये स्थापन करण्यात येत असलेल्या अनेक समित्यापैकी एक सर्वात महत्वाची समिती आहे.ही समिती शाळेवर सनियंत्रण व शाळेचे विविध प्रश्न यावर चर्चा करून ते सोडवण्याचे काम करत असते.शाळेला आलेल्या शासकीय अनुदानाचा खर्च विविध हेतूसाठी केला जातो. त्यावर ही नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते.अजून ही बरीच कामे शाळा व्यवस्थापन समिती करत असते.शाळा व्यवस्थापन समिती कशी बनते.यामध्ये कोणा कोणाला सहभागी करून घेतले जाते.शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती कशा आहेत याची संपुर्ण माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. How the School Management Committee is constituted: Terms, conditions and criteria are as follows.
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली.पहा कोणत्याही शाळेची वेळ तासिका नियोजनासह.
शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतात.
१) सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची असते . (सदस्य सचिव वगळून)
२) यापैकी किमान ७५% सदस्य बालकांचे आई,वडील/ पालक यामधून घेतलेले असतात.
अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येत असते. How the School Management Committee is constituted: Terms, conditions and criteria are as follows.
ब) उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता – पित्यांना प्रमाणशील प्रतिनिधीत्व देण्यात येत असते .
क) साधारणपणे पालक सदस्यांची निवड करतांना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधीत्व मिळेल असे पाहिले जाते .
हे ही वाचा
Jio BP petrol pump Dealership मिळवा आणि महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवा. सुवर्णसंधी !
३) उर्वरित २५% सदस्य पुढील व्यक्तीपैकी असतात.
अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी – १
ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक – १
क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ज्ञ / बालविकास तज्ज्ञ – १
४) वरील अ. क्र. २ मधील बालकांचे आई-वडील/पालक सदस्यांमधून, सदर समिती,अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येत असते.
हे ही वाचा
ठाणे महानगरपालिका नोकरभरती : वरिष्ठ निवासी पदांसाठी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहा.
५) शाळेचे मुख्याध्यापक/प्रभारी या समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.
६) या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५०% सदस्य महिला राहतील.
शाळा व्यवस्थापन समिती कशी बनते याची माहिती असेल तर आपण आपल्या स्थानिक शाळेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू शकतो.जर आपणास यात सहभागी करून घेण्यास टाळाटाळ होत असेल तर याविरुद्ध आपण नियम दाखवून देऊ शकता.