SIR Mapping maharashtra मतदार यादीतून नाव कट होण्याअगोदर हे काम करा

SIR Mapping maharashtra मतदार यादीतून नाव कट होण्याअगोदर हे काम करा या विषयी सविस्तर माहिती.

महाराष्ट्रामध्ये लवकरच SIR सुरुवात होत आहे आणि  Mapping चालू आहे.SIR म्हणजे Special Intensive Revision. यामध्ये बऱ्याच लोकांची नावे मतदार यादीतून नाहीशी होऊ शकतात. हे होऊ नये यासाठी आपल्याला काय करावे लागेल ? आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ? याविषयी सविस्तर माहिती या उताऱ्यामध्ये पाहूया.

या मोहिमेमध्ये मतदार याद्या अपडेट होत असतात. यामध्ये काही डुप्लिकेट नावे असू शकतात,तेही वगळले जाऊ शकतात. मतदारांचे व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करण्यात येत असते. 2002 मतदार यादीमधील आई -वडील किंवा आजी आजोबा यांची नावे जर मतदार यादीत असतील , तर त्यांच्या मुलांची आणि नातवांची नावे या नावाशी Mapping केली जातात. बिहारमध्ये SIR ही मोहीम या अगोदर पार पडलेली आहे.त्यामध्ये काही अंशी मतदार यादीतील नावे कमी झालेली आहेत.

हे ही वाचा: दि. २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत साधना सप्ताह

ज्यांच्या आई- वडिलांचे,आजी आजोबांची नावे २००२ मधील मतदार यादीत नाहीत त्यांचे नाव मैप होणार नाही.अशा मतदारांचे व्हेरिफिकेशन होईल.त्याना कागदपत्रे सादर करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही जणांची नावे याच्यामध्ये दुबार आलेली असतील किंवा डुप्लिकेट सुद्धा असू शकतात, काही नवीन मतदार आहेत ज्यांना यादीमध्ये नावे समाविष्ट करायची असतात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एसआय आर मॅपिंग प्रोसेस सुरू झालेली आहे.

मॅपिंग ही पहिली फेज असणार आहे, तर दुसरी फेज आहे SIR ची. ही आता सुरू होणार आहे .महाराष्ट्रात २००२ साली SIR झालेले होते.

2002 ची जी काही मतदार यादी आहे, सर्व मतदार याद्या अवलोकित होतील . नवीन नावे ज्यांना समाविष्ट करायची आहेत ते सुद्धा यामध्ये 2002 च्या ज्या काही याद्या आहेत त्याचा संदर्भ घेतला जाऊ शकतो.

2002 च्या यादीमध्ये नावच नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म फिलिंग करावे लागेल. आणि ते एप्रिल पासून फॉर्म फिलिंग सुरू होईल.BLO तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष पडताळणी करतील आणि तुम्हाला त्यावेळेस कागदपत्र सुद्धा द्यावे लागतील.

हे ही वाचा: BLO शी संपर्क साधण्यासाठी सोपी युक्ती | Call book करा अशा पद्धतीने

तुम्हाला काय करायचंय तर SIR Mapping मध्ये तुमची 2002 च्या ज्या काही याद्या आहेत त्या अगोदर डाऊनलोड करायच्या आहेत,त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर ते नाव तुम्ही कसे काढायचं आणि आत्ताच्या जर यादीत नाव आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहे . दोन्ही यादीतील नावे यांचे दोन screen shot काढून BLO ला तुम्ही whatsapp ला पाठवू शकता किंवा त्यांच्याकडे तुम्ही तेच जमा सुद्धा करू शकता.

त्याच्यानंतर ते BLO तुमच्या नावाची मॅपिंग करतील.या अगोदर हि BLO यांनी कदाचित केलेले असू शकते.आता हे कशा पद्धतीने करायचं 2002 ची यादी कशी पाहायची? त्यानंतर आताच्या मतदार यादी मध्ये नाव कसं पाहायचे? हे आता आपण पाहू

SIR मॅपिंग करण्यासाठी step by step information:-

1. सर्वप्रथम Play Store वर जाऊन ECINET नावाची ॲप इंस्टॉल करून घ्यावे.

2. ॲप ओपन केल्यावर दहा पर्यायी बॉक्स दिसतील. त्यातील दोन नंबरच्या पर्यायी बॉक्स वर क्लिक करा.
3. जो Search Your Name in Last sir आहे यावर क्लिक करा.
4. राज्य, जिल्हा,मतदार संघ, मतदान केंद्र आणि नाव, यादी भाग, मतदाराचे पूर्ण नाव ही सर्व सविस्तर माहिती भरायची आहे.

5. यातील पूर्ण माहिती असेल तर टाकावी किंवा काही महत्त्वाची माहिती असेल तरी इथे चालू शकते आणि search करू शकता.
6. हे सर्च केल्यावर तुमचे वडील आई किंवा आजी आजोबा यांचे नाव तुम्ही search करून बघू शकता.
7. सर्च केल्यानंतर मतदार यादी येईल या मतदार यादी मध्ये आपल्या ला अपेक्षित असलेले नाव याचा screenshot काढून घ्यायचा आहे.

8. यानंतर आपल्याला जायचे आहे सहा नंबरच्या पर्यायी बॉक्सवर. जो Search Your Name in Voter List आहे. यावर क्लिक केल्यावर आपल्याला सर्च करण्याचे चार ऑप्शन दिसतील. त्यातील एकाचा वापर करून आपण माहिती सर्च करायची आहे.

9. सर्च केल्यावर आपणास आत्ताच्या यादीमधील सर्व डिटेल्स दिसतील. याचा एक स्क्रीन शॉट आपण काढून घ्यायचा आहे.
10. यानंतर आपणास पर्यायी बॉक्स नंबर आठ वर जाऊन क्लिक करायचा आहे.

11. पर्यायी बॉक्स नंबर connect with election official हा आहे. यावर क्लिक केल्यावर Know your BLO पर्याय येईल यावर क्लिक करा.

हे ही वाचा: 2002 मतदार यादीशी आपले नाव मॅप झाले आहे का ? विशेष मोहीम

येथे तुम्हाला BLO यांचा मोबाईल नंबर दिसेल त्यावर आपण संपर्क करायचा आहे आणि जे आपल्याला डिटेल आता आपण ऑनलाईन काढलेले आहेत. स्क्रीन शॉट च्या स्वरूपात ती त्यांना व्हाट्सअप वर पाठवायचे आहेत. यानंतर तुमचं नाव BLO ॲप मध्ये मॅप केले जाणार आहे. अशा पद्धतीने आपले नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये यासाठी आपण काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो.

Leave a Comment