CITILINC कडून दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ.

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात चालणाऱ्या, CITILINC – Nashik City Bus Service मार्फत दिव्यांग व इतर घटकांना काही सवलती देण्यात येत असतात त्यापैकी दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड विषयी माहिती पाहू या.

राज्यात एस.टी. महामंडळ जसे विविध घटकांना सवलती देते त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका आपल्या हद्दीतील लोकांना CITILINC द्वारे काही सवलती देत असते.त्यापैकी विद्यार्थी पास योजना व दिव्यांगासाठी मोफत कार्ड योजना या योजना आहेत.

CITILINC – Nashik City Bus Service वेळापत्रक

हेही वाचा : सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.

दिव्यांगासाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे कि, CITILINC – Nashik City Bus Service ही खूपच उपयोगी असणाऱ्या दिव्यांग मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. website : https://nmpmlportal.amnex.com/#/ आहे त्यावर उपलब्ध आहे

वर्ष २०२२ – २३ मध्ये काढलेल्या दिव्यांग मोफत कार्डला पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार असा उल्लेख आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या कार्डचा ३१ मार्च २०२४ पर्यंत वापर करता येणार आहे.नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत प्रवास करता यावा यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा : रस्ता सुरक्षेबाबत समाजप्रबोधन : मनपा शाळा क्र. 49 पंचक शाळेचा कौतुकास्पद उपक्रम !

दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पासून दिव्यांग प्रवाश्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ३० जून २०२३ पर्यंत सदर मोफत कार्डचा वापर दिव्यांग प्रवासी करू शकत होते. परंतु दिव्यांग मोफत कार्डची मुदत पुन्हा दिनांक ३० मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आल्याने दिव्यांग प्रवाश्यांनी कार्ड नूतनीकरणासाठी पास केंद्रावर गर्दी करू नये. तसेच कार्ड संदर्भातील अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रवाश्यापर्यंत पोहचविण्यात येईल याची सर्व दिव्यांग प्रवाश्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment