सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.

सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक ची वार्षिक सर्वसाधारण सभा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा याबाबत संपूर्ण माहिती.

सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी हॉटेल पंचवड प्राईड मध्ये महालक्ष्मी थिएटर शेजारी, मार्केट यार्ड समोर, दिंडोरी रोड या ठिकाणी नुकतीच पार पडली. Satyamev Urban Co-operative Credit Society Marya. Annual General Meeting of Nashik concluded.

सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्था


या सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबरोबरच सालाबादाप्रमाणे नाशिक महानगरपालिकेतील दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेचा हा कार्यक्रम दोन सत्रात विभागला गेला होता.

हे ही वाचा : केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वाची माहिती.

पहिल्या सत्रामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक या संस्थेचे अध्यक्ष, डॉ. सुनील ढिकले हे उपस्थित होते. त्याचबरोबर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी.टी. पाटील हे ही उपस्थित होते. या यावेळी या शिक्षकांचे मान्यवरांच्या कडून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.मनपा शिक्षण विभागातील आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेल्या या शिक्षकांना या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा : ChatGPT 4 च्या सहाय्याने संपुर्ण फोटो analyse करता येणार.चांगले कि वाईट ?

खालील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार यावेळी प्राप्त झाला.

  • नितीन चौधरी, काझी जहांआरा, अंजली तांबे, सविता पगार, भगवंत राऊत, भाग्यश्री देशपांडे, ज्योती आहेर, अनिल सुळ, विद्या आहेर आणि हेमंत महाजन.
  • त्याचबरोबर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी.टी पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेकडून सन्मानित करण्यात आले.
  • मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांनी महानगरपालिका शिक्षकांविषयी गौरव उद्गार काढले.

हे ही वाचा : पदोन्नती नंतर एक वेतनश्रेणी : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील पदवीधर शिक्षकांना,मुख्याध्यापकांना,केंद्रप्रमुखांना !
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील सर्व शिक्षक गुणी आहेत. चांगल्या कामासाठी ते नेहमी तत्पर असतात्त, सकारात्मक प्रतिसाद देतात असे ते बोलत होते.
सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील खेलुकर यांनी पतसंस्थेच्या पार्श्वभूमी विषयी माहिती दिली. पतसंस्थेचा इतिहास सर्वांसमोर मांडला. भविष्यात सत्यमेव नागरी पतसंस्थेच्या विभाजनाबाबत सुद्धा भाष्य संस्थेचे चेअरमन सुनील खेलुकर यांनी केले.

त्याचबरोबर जर आपण वर्गणी वाढवली तर व्याजदरामध्ये कपात करण्यात येऊ शकते असेही ते म्हणाले. यावर सभासदांनी किती वर्गणी वाढवल्यानंतर किती व्याजदर कमी होऊ शकेल यावर प्रश्न उपस्थित केला. ज्यादा वर्गणी आणि व्याजदर कमी या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे एकमत न झाल्याने कोणताही निर्णय झाला नाही.

व्याजदर कमी न होण्याची काही कारणे सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील खेलुकर यांनी सांगितली.व्याजदर कमी हवा असेल तर त्यावर ही उपाय त्यांनी सांगितला.
वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सभासदांना सुरुची भोजनाची व्यवस्था तेथे करण्यात आलेली होती. भोजनानंतर सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला.

हे ही वाचा : दप्तरमुक्त शनिवार : मी क्वीन…! अनोखा उपक्रम मनपा शाळा क्र.86 (मुली) पाथर्डीगांव येथे संपन्न !
या कार्यक्रमाला सत्यमेव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ अर्थात चेअरमन सुनील खेलूकर सह व्हा. चेअरमन शिरीष पाडवी, कार्यकारी संचालक सुधाकर चोपडे, बाळासाहेब कडलग, बाळासाहेब सातपुते, ईश्वर चव्हाण, संजयकुमार बच्छाव, प्रकाश शेवाळे, धर्मेंद्र बागुल, सुदाम धोंगडे, कल्पना ठाकरे, रेखा लभडे, बाळासाहेब आरोटे, अमित शिंदे इत्यादी उपस्थित होते.

त्याचबरोबर तक्रार निवारण समितीचे सदस्य देविदास सोनवणे,प्रमिला देवरे,प्रमोद ह्याळीज आणि पोपटराव घाणे हे ही उपस्थित होते.या शिक्षक संघटनांचे पदाधिकारी ही उपस्थित होते.
त्याचबरोबर सत्यमेव नागरिक सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश सोनवणे आणि कर्मचारी अनिल राठोड हे सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चव्हाण यांनी केले.

Leave a Comment