दप्तरमुक्त शनिवार : मी क्वीन…! अनोखा उपक्रम मनपा शाळा क्र.86 (मुली) पाथर्डीगांव येथे संपन्न !

दप्तरमुक्त शनिवार: मी queen….! उपक्रम कसा असतो आणि कसा आयोजित केला होता हे थोडक्यात.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांच्या संकल्पनेतून “दप्तरमुक्त शनिवार” हा उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात येत असतो.त्या अंतर्गत शाळामध्ये दप्तराशिवाय अनेक उपक्रम घेण्यात येत असतात. Paperless Saturday: I’m Queen…! A unique initiative completed at Municipal School No.86 (Girls) Pathardigaon!

हे ही वाचा

Dunki film “डंकी” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

नाशिक महानगरपालिकेची शाळा क्र.86 ( मुली ) पाथर्डीगांव येथे अनेक प्रकारचे उपक्रम साजरे करण्यात येत असतात. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे “दप्तरमुक्त शनिवार.” दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत मी क्वीन हा उपक्रम मनपा शाळा क्र.86 (मुली) पाथर्डीगांव येथे संपन्न झाला.

शनिवार दि.023/09/2023 रोजी मनपा शाळा क्र.86 (मुली),पाथर्डीगांव येथे मनपा शिक्षण विभागचे शिक्षणाधिकारी मा.बी.टी.पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत
“मी क्वीन” हा उपक्रम संपन्न झाला.विद्यार्थिनींना सदर उपक्रमाच्या तयारीसाठी दोन आठवडे वेळ देण्यात आला होता.

वर्गात प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी वेगवेगळ्या कलांमध्ये. फक्त त्यांना वारंवार संधी द्या ते पुढे येऊन आपल्यामध्ये आत्मासात असलेले कला व गुण दाखवतात. विध्यार्थ्याला अभ्यासाची ही जोड देऊन त्याला पुढे आणता येते.

हे ही वाचा

दप्तरमुक्त शनिवार : शिक्षणाधिका-यांनी घेतला हातात झाडू मनपा शाळा क्र.53 चेहडी यांच्या स्वच्छ्ता मोहिमेत !

यासाठीच या दप्तरमुक्त शनिवारची “मी क्वीन” उपक्रमाची रचना करण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीनुसार विविध कला, गायन , मातकाम (शिल्पकला) , चित्रकला , वेशभूषा त्याचबरोबर समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द आणि जनरल नॉलेज असे गट पाडण्यात आले आणि विद्यार्थिनींना आवडीनुसार कोणत्याही गटात सहभागी होण्याची संधी दिली. काही विद्यार्थिनी एकापेक्षा जास्त गटातही सहभागी झाल्या.

साधारण प्रत्येकाने आपल्या आवडत्या कलेच्या गटात सामील होऊन ज्याचा प्रतिसाद सर्वोत्तम असेल अशी विद्यार्थीनी त्या गटातील विजेती क्वीन म्हणून घोषित करून मानाचा मुकुट व शैक्षणिक वस्तू भेट देण्यात आली.

गटातील विजेत्या ठरलेल्या क्वीन:


१) कला क्वीन ( गायन )
विजेती क्वीन :-कु.कोमल खिल्लारे

२) कला क्वीन ( मातकाम )
विजेती क्वीन :- कु.प्रीती उमप
( एकूण मातीच्या- 43 वस्तू बनवल्या )

३) कला क्वीन ( कागदकाम )
विजेती क्वीन :- कु.मयुरी भाले
( एकूण कागदाच्या- 28 वस्तू बनवल्या )

४) वेशभूषा क्वीन:-
विजेती क्वीन :- कु.श्रद्धा जाधव

५) सामान्यज्ञान ( समानार्थी शब्द )
विजेती क्वीन :- कु.मेघना झरे ( न थांबता सलग 40 समानार्थी शब्द सांगितले)

६ ) सामान्यज्ञान (विरुद्धार्थी शब्द )
विजेती क्वीन :- कु.पल्लवी आंभोरे
( न थांबता सलग 48 विरुद्धार्थी शब्द सांगितले)

७) जनरल नॉलेज क्वीन:-
विजेती क्वीन:-कु.धनश्री नेटावटे
( न थांबता सलग 38 म्हणी सांगितल्या )

सदर उपक्रमांसाठी कविता पाटील, उषा पगारे, हिलाल जगदाळे आणि मनोज बच्छाव इत्यादी शिक्षकांनी परीक्षक म्हणून काम केले.

सदर उपक्रमामध्ये इ. 5 वी च्या विद्यार्थिनी सहभाही झाल्या. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास दांडगे आणि वर्गशिक्षक राम तळपे आणि शैला बोरसे यांनी आयोजन केले तर उर्वरित शिक्षकवृंदांनी विद्यार्थिनींना उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले व सहभागी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा

Chat bot,PAT (महाराष्ट्र) यावर पायाभूत चाचणी गुण नोंद कशी कराल ?

उपक्रमाचे फायदे :-

१) वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना सहभागाची संधी.

२) प्रत्येकाला आपापल्या आवडीनिवडी नुसार सादरीकरण संधी देता येते.

३) गटात सर्व सारखेच असल्याने विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी होतो.

४) मलाही काहीतरी चांगले करता येते याची प्रचिती त्या विद्यार्थ्याला येते.

५ ) स्पर्धक एकाच थराचे असल्याने स्पर्धाही निकोप होते व आपणही याहीपेक्षा अजून काहीतरी वेगळे करायला हवे याची जाणीव विद्यार्थ्यांना होते.

६) महत्वाचे खेळाबरोबर अभ्यासाचा हेतू ही साध्य होतो.

७ ) प्रत्येकाला सहभाग संधी मिळाल्याने त्यांचाही उत्साह वाढतो.

असे अनेक फायदे आपल्याला होतात. शिवाय उपक्रमाचे आपल्याला इच्छित फलित देखील मिळते.

Leave a Comment