निपुण भारत उत्सव शाळा भेटीमध्ये कोण कोणत्या गोष्टींची पडताळणी होणार याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.
Table of Contents
Amazon Great Indian Sale Live Now
निपुण भारत अभियान अंतर्गत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानाच्या सर्व समावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता पालक गटांची स्थापना करणे व सहभागी करून घेणे यावर आदेश काढण्यात आला आहे. त्याप्रमाणे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात शाळा व गाव स्तरावर माता पालक गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुसार मागील वर्षापासून माता पालक गटा मार्फत प्रत्यक्ष कार्य सुरू आहे,असे दिसून येते.चालू शैक्षणिक वर्ष देखील माता गटांचे पुनर्गठण होऊन दिलेल्या आयडिया व्हिडिओ कार्य सुरू आहे.
हे ही वाचा
सर्व शाळांवर 15 ऑगस्ट रोजी माता गटांना बोलावून कौतुक सोहळा पार पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यभर निपुण उत्सव साजरा होणार आहे . गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील माता गटांना भेटून लक्ष साध्य करण्यासाठी आणि त्यांना या अभियानात नियमित सहभागी व्हायचे आहे.
कालावधी
दिनांक 9 /10 /2023 ते दिनांक 21/ 10 /2023 या कालावधीत नाशिक विभागांमध्ये निपुण उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये आपण स्वतः व आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी( वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता ,गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,गट समन्वय, विषय साधन व्यक्ती ,विषय शिक्षक सर्व समावेशित साधन व्यक्ती) यांनी शाळा भेटी करून गावात माता पालक गटांना भेटी देण्यात येणार आहेत. प्रत्येक अधिकारी किमान तीन गावातील सर्व माता पालक गटांना भेटी देण्यात येणार आहे. असे आदेश नाशिक प्रादेशिक विभाग शिक्षण उपसंचालक यांच्याकडून निघाले आहेत.
उर्वरित गावात माता पालक गटात लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, यांच्या समवेत मुख्याध्यापक,शिक्षक, अंगणवाडी सेविका हे आपल्या उपलब्ध वेळेनुसार या कालावधीत भेटी देणार आहेत .ज्या जिल्ह्यात व तालुक्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रतिनिधी कार्यात आहे, त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालया सोबत संपर्क साधून संयुक्त भेट देण्यात येणार आहे.
हे ही वाचा
कोणत्या जिल्ह्यात निपुण भारत उत्सव आहे ?
हा उपक्रम महाराष्ट्रातील नाशिक या प्रादेशिक विभागातील शाळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.या प्रादेशिक विभागात नाशिक,धुळे,जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो.परंतु राज्यभर हा निपुण भारत उत्सव साजरा करण्यात येणार असे समजते.
आता पालक गटांना भेटी देत असताना लीडर माता व पालक माता गटांच्या सदस्या सोबत साप्ताहिक बैठक, शालेय मासिक,माता गटांची कार्यशाळा,आयडिया इ.विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या भेटीदरम्यान घेतलेल्या निरीक्षणे राज्यस्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक भरावी. भेटी देणारे सर्व अधिकारी यांनी या लिंक मध्ये माहिती भरणे व फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. माता पालक गटांच्या भेटींच्या संकलित अहवालावर जिल्हा/ तालुका स्तरावर चर्चा करण्यात येणार आहे. सोबत दिलेली प्रश्नावली भेटीदरम्यान माता गटांसोबत प्रभावी चर्चा घडवून आणण्यासाठी उपयोग होईल.
मार्गदर्शक प्रश्नावली
प्रत्येक गावात वाडी वस्ती येथे माता पालक गट तयार झाले आहे का ? या वर्षामधील इयत्ता पहिली माता या गटामध्ये सहभागी आहे का? हे पाहणे
प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यास आयडिया व्हिडिओ मिळतात का ? हे पाहणे.
हे ही वाचा
CITILINC कडून दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ.
गावातील सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडिया व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काम करतात का ? हे पाहणे.
आपल्या मुलांने निपून व्हावे याबद्दल मातांना नेमके काय वाटते आहे?
माता पालक गटासोबत भेटी देणारे अधिकारी यांनी आयडिया व्हिडिओ मधील काही तास करून दाखवावा.
शिक्षक व इतर मंडळी या माता गटांना कसे सहकार्य करीत आहे याबाबत चर्चा करण्यात यावी.
प्रत्येक शाळेत निपुण प्रतिज्ञा व निपुण चे उद्दिष्ठे लावण्यात आली का ? हे पाहणे व माता पालक संबंधी शाळेमध्ये माहितीसाठी स्वतंत्र रजिस्टर केले आहे का ? हे पाहणे.
त्यांच्या गटात काय काय गमती जमती होत आहेत हे पाहणे.
गटभेटीदरम्यान गटांचे काम दाखवणारे निवडक फोटो,व्हिडिओ त्यांच्या परवानगीने घेण्यात यावे.
वरील सर्व मुद्द्यांची गावातील माता पालक भेटीदरम्यान पडताळणी करण्यात येणार आहे .
या भेटीदरम्यानची सदर सोबत दिलेली नोंदणी लिंक: https://bit.Iy/nipuntsav2023 भरावयाची आहे . निपुण. उत्सव संदर्भात सविस्तर संकल्पना बाबत प्रथमचे जिल्हा प्रतिनिधी समवेत आपल्या जिल्ह्याची जिल्हास्तरीय एक तासाची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती.