जागतिक टपाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक चे 5 हजार विद्यार्थी पत्र लिहून संवाद साधणार.

जागतिक टपाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक चे 5 हजार विद्यार्थी पत्र लिहून संवाद साधणार या विषयी संपुर्ण माहिती या लेखात पाहू या.

जागतिक टपाल दिनाच्या (दि. ९ ऑक्टोबर) औचित्याने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, क्वालिटी सिटी नाशिक, रूटस्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने मा. पंतप्रधानांना नाशिकमधील ५ हजार शालेय विद्यार्थ्यांनी पत्र लिहून संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाकडून आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभाग घेण्याबाबत अवगत करण्यात आले आहे.5 thousand students of Nashik will write a letter to Prime Minister Narendra Modi on the occasion of World Postal Day


या वर्षीच्या जागतिक पोस्ट दिनाची थीम आहे “विश्वासासाठी एकत्र सुरक्षित आणि परस्परावलंबी विष्यासाठी सहयोग. “

क्वालिटी सिटी नाशिक अभियान देखील याच थीमशी अनुकूल आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आणि दर्जा मानांकन संस्थेने देशातील पहिली क्वालिटी सिटी म्हणून नाशिकला मानांकित करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यात नाशिक महानगरपालिका, नाशिक सिटीझन्स फोरम, क्रेडाई-नाशिक मेट्रो, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्या प्रमुख सहभागासह नाशिकमधील विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा अधिक संस्थांचा सहयोग लाभत आहे.

हे ही वाचा

CITILINC कडून दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ.


क्वालिटी सिटी अभियानांतर्गत नाशिकमधील स्वच्छता, कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्राचे दर्जा उन्नतीकरण ही प्रमुख उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत. त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी शहरातील स्वच्छतेबाबतीत जागृती आणि कृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच घरेलू कामगार, बांधकाम कामगार आदी कष्टकरी वर्गाला कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रातही क्वालिटी सिटी अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून शिक्षणाच्या पद्धतींचे सक्षमीकरण, दुर्बल शाळांचे उन्नतीकरण आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडलेल ठेवणे या दिशेने उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा

राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत मनपा शाळा क्र.77 अंबड शाळेतील विद्यार्थी चेतन पवार ने पटकावले कास्य पदक.

पत्राचा उद्देश्य व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचे मुद्दे :

नाशिकला पहिले गुणवत्ता शहर म्हणून निवडल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाप्रती (PMO) कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, डिजिटल शिस्त, नवीन पिढीमध्ये पोस्टकार्ड वापरण्याबाबत जागरूकता, स्वच्छ नाशिक, रस्ता सुरक्षा आणि क्वालिटी सिटीबद्दल जागरूकता वाढवणे, हाही त्यामागीत प्रमुख उद्देश्य आहे.
विद्यार्थांनी पोस्टकार्डवर स्वहस्ताक्षरात खालील पत्ता लिहायचा आहे.
प्रति,
मा. पंतप्रधान कार्यालय,
७, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली- ११००११.

हे ही वाचा

स्ता सुरक्षेबाबत समाजप्रबोधन : मनपा शाळा क्र. 49 पंचक शाळेचा कौतुकास्पद उपक्रम !

नाशिकला देशातील पहिली क्वालिटी सिटी म्हणून निवडल्याबद्दल मा. पंतप्रधान कार्यालयाचे आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानायचे आहेत.
नाशिकला क्वालिटी बनविण्यासाठी, शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी, कौशल्यपूर्ण ठेवण्यासाठी, शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी आणि शिक्षणात खंड पडून स्वतःला व इतरांना शाळाबाह्य होऊ न देण्यासाठी या पत्रातून निर्धार व्यक्त करायचा आहे.

आपले घर, परिसर, शाळा आणि शहर स्वच्छ व सिंगल यूज प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी काय उपक्रम राबविणार आणि काय संकल्प घेणार याबाबतही पत्रात लिहिण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना वरील विचार त्यांच्या पद्धतीने मुक्तहस्ते व्यक्त करता येणार आहेत. मजकूर, चित्र, कविता अशा विद्यार्थ्यांना आवडतील अशा माध्यमांचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे.
या उपक्रमात पत्र दि. ९ ऑक्टोबरपर्यंत पोस्टात टाकायचे आहे.
शिक्षकांना आवाहन आणि विनंती करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डसह हात वर करून, वाटप करताना, लिहिताना (शक्य असल्यास पोस्टबॉक्समध्ये पोस्ट करणे) यांचे ग्रुप फोटो तसेच काही निवडक पोस्टकार्डचे फोटो क्लिक करून qualitycitynashik@gmail.com या मेल आयडीवर अथवा ७०२११७४९८१ या नंबरवर पाठवावेत असे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment