PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तज्ञ वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 80 जागा भरवण्यात येणार आहे या विषयी सविस्तर माहिती.
आजच्या काळात सरकारी नोकरी मिळवण्यास खूप अडथळे येत असतात. अनेक सुशिक्षित बेरोजगार आज दिसत आहेत.आज सरकारी नोकऱ्या ह्या मिळत नाहीत. PCMC येथे पदांची भरती सुरू आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अर्ज पाठवावेत . या भरतीसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
हे हि वाचा: MSRTC मध्ये आता होणार मोठी भरती; वेतन किती असणार?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत तज्ञ वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी 80 जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड येथील
रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी तज्ञ वैज्ञानिक अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून सदर तज्ञ वैज्ञानिक अधिकारी मुलाखतीसाठी हजर राहणेस कळविण्यात आले आहे.
Table of Contents
पदसंख्या
या भरतीसाठी एकूण 80 जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत तज्ञ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
हे हि वाचा: डी.एड,बी.एड शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे भरली जाणार.
नोकरीचे ठिकाण
पिंपरी चिंचवड हे नोकरीचे ठिकाण आहे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे.
मुलखातीची तारीख
उमेदवारांची मुलाखत ही दर सोमवारी घेतली जाणार आहे.
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेचे असेल, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८ यांचे कार्यालयात घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in
निवड प्रक्रिया
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
- मुलाखतीसाठी दर सोमवारी हजर राहायचे आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.