डी.एड,बी.एड शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे भरली जाणार.

डी.एड,बी.एड शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे भरणार : डी.एड,बी.एड धारकांसाठी आनंदाची बातमी सविस्तर माहिती.

  शिक्षकांची ज्यावेळी कमतरता असते त्यावेळी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम नक्कीच होतो. डी.एड.बी.एड पदवी धारण केलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.उत्तर महाराष्ट्रात शिक्षकांची साडेचार हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे याचा शिक्षणावर परिणाम दिसत आहे.

हे ही वाचा

सायबर सुरक्षा ; तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी.

भरतीसाठी पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून डी.एड,बी.एड धारक ZP Teacher Recruitment 2023 या संधीची वाट बघणारे अनेक उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या हिरव्या कंदिलामुळे या जागा भरल्या जातील. या कारणामुळे डी.एड.बी.एड धारक सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यांमधील मागील काही काळापासून झालेल्या पट पडताळणीच्या चुकीच्या पद्धतीमुळे शिक्षक भरती प्रक्रिया ठप्प झाली होती.मागील काही वर्षांपासून शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक भरती होईल असे सांगूनही ती होत नव्हती. यामुळे भावी शिक्षकांचा हिरमुड होत होता.या कारणामुळे डी.एड,बी.एड पदविकाधारक खूप संतप्त झाल्याने, त्यांनी सोशल मीडियावर भरतीबाबत मोहीम सुरू केली होती.

हे ही वाचा

Google maps मध्ये येणार नवीन फीचर | पेट्रोल डिझेलचा खर्च होणार कमी.

 राज्यामध्ये अनेक शिक्षक भरतीसाठी वाट बघत होते. त्यामुळे हजारो उमेदवारांना शिक्षण आयुक्तालयाने आनंददायी अशी बातमी दिली आहे. शिक्षण आयुक्त सुरज पांढरे यांनी शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत .

राज्यामध्ये तीन हजार शिक्षक जागा भरण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती. त्या पदासाठी तो उमेदवार योग्य आहे की, नाही याची चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बिंदूनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीची जाहिरात अजून तरी पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्धी झाली नसल्याने सर्व उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, रिक्त पदांची माहिती, व नोंदणी करण्याची सुविधा, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वर देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करत योग्य असल्यास बिंदुनामावली विषयानुसार रिक्त पदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिन द्वारे मान्य करतील.प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिन वर जाहिरात तयार झाल्यावर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात दिसणार आहे.

हे ही वाचा

संचालक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात नोकरी ! 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा.

शिक्षण मंत्र्यांनी आरक्षणनिहाय रिक्तपदे, गट विषयीनिहाय रिक्त पदांची माहिती कार्यवाही करण्यासाठी आवश्यक पडताळणी करीत जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिक्षक भरतीसाठी थोडाही वेळ न घालवता पवित्र संकेतस्थळावरील सूचनानुसार लगेच जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आदेश स्पष्ट करण्यात आले आहेत .

शिक्षकांची निवड या गुणवत्तेवर

 विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान हे शिक्षकांचे रिक्त पदांमुळे होत आहे हे रोखण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये शिक्षक रुजू होतील.सरकारी व खासगी संस्थानिहाय पवित्र संकेतस्थळावर स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती गुणवत्तेनुसार होणार आहे. टीईटी व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची गुणवत्तायादीनुसार उमेदवारांना संधी मिळणार आहे.

Leave a Comment