सायबर सुरक्षा ; तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी.

सायबर सुरक्षा ; तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी या बाबत सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे.

सायबर सुरक्षा आणि सुरक्षतेच्या मूलभूत बाबी:-

ऑनलाईन माध्यमे ही कार्य सुलभ होण्यासाठी मदत करतात परंतु ही माध्यमे वापरताना ती सुरक्षितपणे कशी वापरावी याविषयीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.शिक्षण व्यवस्थेत ऑनलाईन माध्यमे वापरत असताना त्यातील प्रत्येक घटकाला म्हणजेच विद्यार्थी, शिक्षक,पालक, मुख्याध्यापक, अधिकारी वर्ग,शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक यांना सजग राहणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठीच येथे ऑनलाईन माध्यमे वापरताना कोणती काळजी घ्यावी हे समजून घेऊ या.

सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता म्हणजे काय ? माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर म्हणजे ‘सायबर सुरक्षा’ होय. यात माहिती सुरक्षित ठेवणे, माहिती विषयी जबाबदार असणे, इतर ऑनलाईन असणाऱ्या व्यक्तीविषयी आदर बाळगणे व इंटरनेट आचारसंहितेचा चांगल्या प्रकारे वापर करणे. तसेच नेटवर्क, संगणक,प्रोग्राम व माहिती इत्यादींवर होणारे हल्ले नुकसान व अनाधिकृत वापर यांपासून सुरक्षित राहण्यासाठीच्या तंत्रज्ञान प्रक्रिया व सरावांचा समावेश सायबर सुरक्षेत असतो.

संगणक सुरक्षा

● संगणक वापरात नसताना संगणकाला लॉग ऑफ करावे.
● संगणक थेट वीज पुरवठा स्विच बोर्डाला जोडू नये.
● विजेच्या दाबाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्टॅबिलायझर UPS वापरावे.
● पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर करू नये.
● आपल्या संगणकास अज्ञात डिवाइस कनेक्ट करू नये. त्याच्यामध्ये व्हायरसचा धोका असू शकतो.

हे ही वाचा : Google maps मध्ये येणार नवीन फीचर | पेट्रोल डिझेलचा खर्च होणार कमी.

● केवळ योग्य अशी मुक्त स्त्रोत (open resource) किंवा परवानाकृत (Licensed) सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम वापरावी.
● प्रत्येकसिस्टीम मध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अदययावत असल्याचे नियमितपणे तपासावी.
● मजबूत फायरवॉलचा वापर करावा.
● bat, cmd, exe, pdf यांसारख्या फाईल फॉरमॅट सामग्री फिल्ड रिंग सॉफ्टवेअर अनावश्यक फाइल्सचे (extension) अवरोधित करण्यासाठी वापरावे.
● विशिष्ट व स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करावा.
● वारंवार आपले पासवर्ड बदलावेत.
● जुन्या पासवर्ड चा पुन्हा वापर करू नये.
● आपली संगणक प्रणाली आणि लॅब अधिकृत व्यक्तीच वापरत असल्याची खात्री करावी.
● वैयक्तिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करावी उदा.., वैयक्तिक यूएसबी किंवा हार्ड ड्राईव्ह.

अंतरजाल (इंटरनेट) सुरक्षितता व शिष्टाचार

  1. इतरांच्या गोपनीयतेचा आदर करा.
  2. ब्लॉगिंग आणि ई-मेल चॅटिंग करताना भाषेच्या वापरामधील योग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करा.
  3. दुसऱ्याच्या इमेल खात्यात लॉग इन करू नका.
  4. धोकादायक साईट पासून वाचण्यासाठी ब्राउजर ऑटो अपडेट मोडवर ठेवा.

ई-मेल सुरक्षितता

● अनोळखी व फसव्या ई-मेल ला प्रत्युत्तर देऊ नका.

हे ही वाचा

निपाह व्हायरस ची दहशत : निपाह संपुर्ण माहिती.देशात अलर्ट

● नाव, जन्मतारीख, शाळेचे नाव,पत्ता, पालकांची नाव, यांसारखी वैयक्तिक माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही देऊ नका.
● फसव्या जाहिरातींच्या अमिषाला बळी पडू नका.
● अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या ई-मेल कडे दुर्लक्ष करावे.
● अज्ञात स्त्रोतांकडून आलेले ईमेल अटॅचमेंट उघडू नये किंवा त्यावरील दुव्यांवर क्लिक करू नये.
● अज्ञात फाइल्स कदाचित आपले डिवाइस हॅक करू शकतात.
● फिशिंग वेबसाईट पासून सावध राहावे. अकाउंट मध्ये URL तपासावे.
● इतरांना स्पॅम किंवा संशयास्पद ई-मेल पाठवू नये.

सुरक्षित सामाजिक नेटवर्किंग

  1. आपली वैयक्तिक माहिती उघड करणे टाळावे. जसे आपले वय,पत्ता,दूरध्वनी क्रमांक, शाळेचे नाव, इत्यादींमुळे ओळख चोरी होऊ शकते.
  2. नेटवर्किंग साइटवर आपले गोपनीयता सेटिंग्स काळजीपूर्वक बदलावे.
  3. आपला संकेत शब्द (पासवर्ड)आपल्या व्यतिरिक्त कोणासही उघड करू नये.
  4. केवळ ज्ञात लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्याशी सहयोग करावा.
  5. इतरांच्या भावना दुखावणारे असे काहीही पोस्ट करू नये. छायाचित्रे,व्हिडिओ पोस्ट करताना नेहमी सावधगिरी बाळगावी.
  6. सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो व्हिडिओ आणि संवेदनशील माहिती पोस्ट करताना योग्य ती काळजी घ्यावी कारण ही माहिती कायमस्वरूपी ऑनलाईन राहते.
  7. नेटवर्किंग साइटवर आपल्या मित्राची माहिती पोस्ट करू नये,ज्यामुळे त्यांना धोका पोहोचू शकेल.आपल्या मित्राचे त्यापासून रक्षण करावे.
  8. सोशल नेटवर्किंग वर आपल्या भविष्यकालीन योजना पोस्ट करणे टाळावे.
  9. कोणत्याही सोशल साइटवर स्वतःसाठी बनावट प्रोफाइल तयार करू नये.
  10. आपण सोशल मीडियावर वाचलेल्या कोणत्याही गोष्टी विश्वसनीय स्त्रोतांवरून आल्याची तपासणी न करता अग्रेषित (फॉरवर्ड) करू नये.
  11. सोशल नेटवर्किंग साइटवर लॉग इन केल्यानंतर त्याचा वापर संपल्यानंतर लॉग आऊट व्हायला विसरू नये.

सायबर धमकी (Cyber bullying)

एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक, हानिकारक, खोटी किंवा खरी माहिती इतरांना पाठवणे, पोस्ट करणे अथवा शेअर करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. ती व्यक्ती सायबर कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे.

सायबर बॉलिंग मध्ये याचा समावेश होतो.

● तुमच्यावर किंवा तुमच्याविषयी इतर कोणी टिप्पणी करणे.
● कोणीतरी तुमच्या नावावर बनावट प्रोफाइल तयार करून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे.
● ऑनलाइन किंवा मोबाईल फोनवर धमकी किंवा अपमान जनक संदेश पाठविणे.
● ऑनलाइन ग्रुप मधून आणि फोरम मधून वगळणे.
● आपल्या परवानगीशिवाय आपले छायाचित्र ऑनलाईन अपलोड करणे.
● एखाद्या साइटवर आपल्याबद्दल अफवा पसरविणे.
● खात्याचा पासवर्ड चोरणे आणि अयोग्य संदेश पाठविणे.
● आक्षपार्ह चॅट.

सायबर बुलिंग झाल्यास खालील गोष्टी कराव्यात

प्रतिसाद देऊ नये

जर कोणी तुमच्या सोबत सायबर बुलिंग करत असेल, तर त्याला प्रतिसाद किंवा उत्तर देऊ नये यामुळे आपली समस्या आणखी बिघडू शकते किंवा आपणास अडचणीस आणू शकते.

स्क्रीन शॉट

सायबर बुलिंग होत आहे असे वाटल्यास त्या गोष्टीचा स्क्रीनशॉट घ्यावा वर रेकॉर्ड बनवावे.

ब्लॉक आणि रिपोर्ट

बऱ्याच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे हे वैशिष्ट्ये असते, जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर, सोशल मीडियावर त्याचा ब्लॉक करून तसाच रिपोर्ट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला द्यावा.

फायबर बुलिंग बद्दल बोला

सायबर बुलिंग आपल्यावर बऱ्याच मार्गाने परिणाम करते. अशावेळी आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि वरिष्ठांना त्याबद्दल सांगावे.

खाजगी पण जपा

नेहमी आपली सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग बदलावी व ती किती मर्यादेपर्यंत सार्वजनिक करायची ते सायबर बुलिंग झाल्यास खालील गोष्टी कराव्या.

सावध व्हा

सायबर जगतामधील सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षा उपायांसह अपडेट राहावे.

● निश्चित करा

अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नये. आपण ज्याला ओळखत नाही अशा लोकांसोबत ऑनलाईन बोलू नये.

Leave a Comment