Google maps मध्ये येणार नवीन फीचर | पेट्रोल डिझेलचा खर्च होणार कमी.

Google maps या ॲपमध्ये आता नवीन फीचर येणार आहे. या फिचरमुळे पेट्रोल डिझेलचा खर्च ,वेळ ,पैसा यांची देखील बचत होणर आहे. या विषयी सविस्तर माहिती.

एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी व आपण मार्ग चुकलो असेल तर गुगल मॅप हा आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करत असते त्यामुळे गुगल मॅपची प्रत्येक वेळी आपल्याला मदत होत असते. आता गुगल मॅप वर नवीन फीचर येणार आहे. या नवीन फीचर मुळे एखाद्या ठिकाणी जाण्या-येण्याचा खर्च, लागणारा वेळ, ट्रॅफिक या सर्व गोष्टींबाबत आधीच माहिती व त्या मार्गाचे दोन-तीन पर्याय देखील समजले जाऊ शकणार आहे .

हे ही वाचा

संचालक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात नोकरी ! 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा.

नवीन वर्षापासून गुगल मॅप या ॲपमध्ये ‘फ्युएल एफिशियंट रुटींग’ आणत आहे. यापूर्वी हे फीचर फक्त अमेरिका,कॅनडा आणि इतर देशांमध्ये मर्यादित होते.आधी हे फीचर इतर देशांमध्ये आले परंतु आता हे फीचर नवीन वर्षापासून भारतात देखील येणार आहे.यामुळे पर्यावरणाची हानी कमी होईल व पर्यावरण वाचवण्यासाठी मदत होईल.

 हे फीचर कसे काम करते:-

हे ही वाचा

दुसरी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

कंपनीने सांगितले की, या वैशिष्ट्याच्या मदतीने आतापर्यंत 2.4 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी केले आहे. अज्ञात लोकेशन समजून घेण्यासाठी गुगल मॅप मध्ये ‘address description’ फीचर जोडत आहे. ज्यावेळी तुम्हाला कोणी त्यांचे लोकेशन शेअर करते, तेव्हा कंपनी तुम्हाला त्या ठिकाणांच्या भोवती असलेले 5 लँडमार्क आणि प्रसिद्ध ठिकाणे दाखवेल याचा फायदा म्हणजे तुम्हाला जिथे जायचे आहे, तिथे सहज तुम्ही पोहोचू शकाल.

नव्या वर्षात नवे अपडेट मिळणार

  गुगलचे हे अपडेट लवकरच Android आणि ios वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. गुगल हे फीचर पुढील वर्षात लॉन्च करण्याची शक्यता आहे. जिओफेन्स वॉरंटच्या वाढत्या गैरवापरामुळे असा बदल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यातील अधिकारी जिओफेन्स वॉरंटद्वारे लोकांच्या प्रायव्हसी मध्ये हस्तक्षेप करत आहेत ज्यामुळे ही मागणी वारंवार केली जात होती. गुगलने ही अंमलबजावणी अखेर केली.

हे ही वाचा

18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार

निवडक डेटा डिलीट करण्याची सुविधा हा गुगलच्या मॅप सेवेतील सर्वात मोठा बदल आहे.आता गुगल मॅप गुगल कंपनीने मागील इतिहास हटवण्यासाठी देखील सुविधा देणार आहे. वापरकर्ते लोकेशन सर्व्हिंग चालू ठेवल्यानंतरही ती पूर्णपणे नियंत्रित करू शकतात.वापरकर्त्यांच्या हातात आता डेटा किती प्रमाणात साठवायचा आहे हे ठरते.

Leave a Comment